नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०२१ या पाच वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये दोन हजार ५७२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ५५ जण कारमधून प्रवास करीत होते. याच कालावधीत शहरात सीटबेल्ट न लावलेल्या ९५ हजार ९८५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली
आहे. मात्र, तरीदेखील वाहनचालकांमध्ये सीटबेल्ट न लावण्याचे प्रमाण अद्यापही वाढलेले दिसत नाही.
उद्योजक सायरस मिस्त्री, राजकारणी विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर सीटबेल्टच्या वापराचे महत्त्व अधोरेखित झाले. दोघेही आलिशान कारमधून प्रवास करत असताना सीटबेल्ट न लावल्याने अपघातात गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समाेर आले. त्यामुळे सीटबेल्टच्या वापराचे महत्व आता समोर आले. त्यामुळे सीटबेल्टच्या वापराचे महत्व आता समाेर येत आहे. मात्र, अद्यापही शहरात सीटबेल्ट वापराचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. शहर वाहतूक पोलीसांनी 2017 ते 2012 या कालावधीत तब्बल ९५ हजार ९८५ हजार लोकांवर सीटबेल्ट न लावल्याबद्दल कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे शहरात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या एक लाख ३७ हजार ६६७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गत पाच वर्षांत झालेल्या शहरातील एकूण अपघातांमध्ये दुचाकीस्वार दोन हजार एक जणांचा मृत्यू झाला आहे. तरीदेखील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व लक्षात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून नेहमी दंडात्मक कारवाई, जनजागृती, प्रबोधन करूनही बेशिस्त चालकांची संख्या घटत नसल्याने असुरक्षितता वाढली आहे.
गत पाच वर्षांतील कारवाई अशी….
वर्ष विना हेल्मेट विना सीटबेल्ट
2017 22,168 28,531
2018 21,342 20,831
2019 31,697 16,936
2020 51,241 13,562
2021 11,219 16125
सीटबेल्ट आणि हेल्मेट वापराबाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. दंडात्मक कारवाईसोबतच त्यांचे प्रबोधन केले जात आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हेल्मेट व सीटबेल्ट वापरावे. – सीताराम गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर वाहतुक.