पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड़ अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) चा आगामी चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे नाव 'भेडिया' (Bhediya) असून यात वरुणने धमाकेदार अभिनय साकारला आहे. सध्या चित्रपटातील वरूणचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
वरुण धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन दोघांच्या इन्स्टाग्रामवर आगामी 'भेडिया' (Bhediya) चित्रपटाचा पहिला लूक शेअर करण्यात आला आहे. या शेअर केलेल्या लूकमध्ये वरूणाचे डोळे खतरनाक दिसत असून त्याच्या आतमध्ये एक आगीत जळणारा लांडगा (भेडिया) दिसतोय. यावरून वरूण कोणत्या तरी गोष्टीमुळे पेटून उटलेला दिसत आहे.
याच दरम्यान क्रिती सेनॉन या पोस्टरमध्ये दिसत असून तिच्या हातात लाईटची बॅटरीचा प्रकाश दाखवताना दिसतेय. यासोबत या पोस्टरवर 'भेडिया' चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटची माहितीदेखील दर्शविली आहे. यात त्यांनी 'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी म्हणजे, १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. या फोटोच्या कॅपशनमध्ये दोघांनी 'अब होगा जंगल में कांड' असे म्हटलं आहे. यावरून वरूण लवकरच जंगलात धुमाकूळ घालणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वरुण आणि क्रितीच्या आगामी 'भेडिया' चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे. हा चित्रपट २५ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये २D आणि ३D मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'भेडिया' चित्रपटात वरुण आणि क्रितीने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे.
हेही वाचलंत का?