पुढारी ऑनलाईन डेस्क : जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar Trailer) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट आहे. अभिनेता रणवीर सिंह, बोमन इराणी आणि शालिनी पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'जयेशभाई जोरदार'मध्ये कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे. 'जयेशभाई जोरदार' हा चित्रपट भ्रूणहत्या आणि स्त्री-पुरुष समानता या सामाजिक विषयांवर बनवला आहे. हा चित्रपट १३ मे, २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Jayeshbhai Jordaar Trailer)
अभिनेता रणवीर सिंहच्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. एक सामाजिक संदेशासह कॉमेडीचा तडका आणि दमदार कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.
रत्ना पाठक यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. २ मिनिटे ५६ सेकंदांचा हा ट्रेलर रणवीर सिंहनेही शेअर केला आहे. 'जयेशभाई जोरदार'मध्ये सरपंचाचा (बोमन इराणी) एकुलता एक मुलगा (रणवीर सिंह) याला एक मुलगी आहे. पण कुटुंबाला एका मुलाची गरज आहे, जो आपली पिढी पुढे घेऊन सरपंचाची खुर्ची सांभाळेल. जयेशभाईची पत्नी मुद्रा (शालिनी पांडे) पुन्हा एकदा प्रेग्नेंट आहे. घरातील मंडळी गर्भलिंग निदान करतात. जसं समजतं की, मुद्राच्या पोटात मुलगा नाही तर मुलगी आहे, मंडळी भ्रूण हत्या करण्याचा निर्णय घेतात. पण, यावेळी जयेशने ठोस निर्णय घेतलाय़ की, तो आपल्या मुलीला या जगात आणणार. चित्रटात सामाजिक विषयाशिवाय, ही कहाणी तुम्हाला गुजरातचे सुंदर दृश्ये आणि भाषेने आकर्षित करतील. सोबतच रत्ना पाठक आणि रणवीर सिंहचा दमदार अभिनय या कथेला आणकी मजबूत बनवतो.
गर्भलिंग चाचणी, मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष समानता आणि भ्रूणहत्या या विषयांवर बॉलिवूडमध्ये यापूर्वीही अनेक चित्रपट बनले आहेत. आता 'जयेशभाई जोरदार'चा दिग्दर्शक दिव्यांग ठक्कर कोणत्या नव्या स्टाईलने ही कथा प्रेक्षकांसमोर आणतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.