Priyanka Chopra : इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनावरून प्रियांका चोप्राचे धाडसी विधान, म्हणाली…
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ( Priyanka Chopra ) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती कोणत्याही फॅशन सेन्सने नव्हे तर एका आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहे. नुकतेच प्रियांकाने इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनातील महिलांना पाठिंबा दर्शविला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर इराणी महिलांच्या आंदोलनाचे समर्थनात एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.
इराण आणि जगभरातील महिला सार्वजनिक ठिकाणी त्यांचे केस कापत असल्याने आणि मृत्यू पावलेल्या महसा अमिनीसाठी ठिकठिकाणी आंदोलन छेडले जात आहे. या आंदोलनात इराणच्या पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने हिजाब घातल्यामुळे महसा अमिनीचे आयुष्य निर्दयीपणे संपवल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे सध्या इराणमध्ये इराणमधील सामाजिक अणि राजकीय वातावरण तापले आहे. यासाठी अनेक महिलांनीदेखील यात सहभाग घेतला आहे. हे आंदोलन हळूहळू मोठे होणार आहे. हे आंदोलन कोणीही थांबवू शकणार नाही असेही प्रियांकाने म्हटलं आहे.
प्रियांकाने इराणमध्ये आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या महिलांचेदेखील कौतुक केलं आहे. यात ती म्हटलं आहे की, या महिलांचे धाडस आणि कार्य पाहून मी आश्चर्यचकित झाले आहे. स्वत: च्या हक्कासाठी लढणे आणि त्याप्रसंगी कधी- कधी जीव धोक्यात घालणे इतके सोपे नाही. तरीही या महिला स्वत : च्या हक्कासाठी लढत आहेत. या त्याच्या धाडसी कार्यामुळे मी प्रभावित झाले असून मी त्यांचे समर्थन करत आहे. तसेच या आंदोलनात सत्तेत असलेल्या लोकांनी आणि अधिकाधिक महिलांनी सहभाग घ्यावा यासाठी आवाहन केलं आहे.
काय आहे प्रकरण?
महसा अमिनीला १३ सप्टेंबर रोजी इराण पोलिसांनी हिजाब नीट न घातल्याने तेहरान मेट्रो स्टेशनवर अटक केली होती. यानंतर तुरुंगात तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यातच ती तीन दिवस कोमात गेली. यातच तिचा मृत्यू झाला. यानंतर इराणी महिलानी उग्र आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचलंत का?