Ae Watan Mere Watan
Ae Watan Mere Watan

Ae Watan Mere Watan : साराचा देशभक्तीवर येतोय नवा चित्रपट; बनणार स्वातंत्र्यसैनिक

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अतरंगी रे' या चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणखी एक नवा चित्रपट घेवून येत आहे. साराच्या या आगामी चित्रपटाचे नाव 'ऐ वतन मेरे वतन' ( Ae Watan Mere Watan ) असे आहे. या चित्रपटात सारा बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आणि सत्य घटनेवर आधारित असून ओटीटीवर रिलीज होणार आहे.

अभिनेत्री सारा अली खानने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत वरुण धवन साराच्या आगामी प्रोजक्टबद्दल ( Ae Watan Mere Watan ) बोलताना दिसतोय. यात वरुण सारा अली खानचा लवकरच 'ऐ वतन मेरे वतन' चित्रपट अमेझोन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. तर हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असून चित्रपटचा पहिला लूक लवकरच शेअर होणार असल्याचेदेखील त्याने सांगितले आहे.

'ऐ वतन मेरे वतन' चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन दरब फारुकी आणि कन्नन अय्यर यांनी केलं आहे. हा चित्रपट २४० हून अधिक देशांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून यात १९४२ मधील भारत छोडो आंदोलनातील कथानक दाखविण्यात येणार आहे. एका शूर स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका ती साकारणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि अपूर्व मेहता यांनी संयुक्तपणे चित्रपटाची निर्मिती केली आहे.

याआधी सारा आणि वरूण एकत्रित 'कुली नंबर १' च्या रिमेकमध्ये दिसले होते. सारा शेवटची बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासोबत 'अतरंगी रे' या चित्रपटात दिसली होती. साराकडे सध्या अनेक आगामी चित्रपटाची ऑफर आहे. साराने विक्की कौशलसोबत एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. परंतु, या चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यात आहे. याशिवाय ती विक्रांत मेस्सीसोबत 'गॅसलाइट' नावाच्या चित्रपटातही दिसणार आहे. वरुण धवनबद्दल बोलायचे झाले, तर तो 'भेडिया' मध्ये दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news