Mission LokSabha 2024 : भाजप कार्यकर्त्यांची आता ‘यात्रा पर चर्चा’!

Mission LokSabha 2024 : भाजप कार्यकर्त्यांची आता ‘यात्रा पर चर्चा’!
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वसामान्य जनतेची थेट मत जाणून घेत त्याअनुषंगाने भविष्यातील योजना आखणीचा (Mission LokSabha 2024) भाजपचा मानस आहे. याच अनुषंगाने देशात २०२४ मध्ये होवू घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष 'यात्रा पर चर्चा' हा कार्यक्रम राबवणार आहे. मुख्यत्वे ट्रेन तसेच लांब पल्ल्यांच्या बस प्रवास दरम्यान भाजप कार्यकर्ते निवडणुकीसंबंधी प्रवाशांसोबत विस्तृत चर्चा करताना दिसून येतील.

केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीत भाजपने देशभरात 'चाय पर चर्चा' कार्यक्रम राबवला होता. त्यावेळी पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले होते. याचधर्तीवर आता भाजप कार्यकर्ते धावत्या रेल्वे मध्ये केंद्रातील मोदी सरकारने राबवलेल्या योजनांच्या यशासंबंधी सह- प्रवाशांसोबत चर्चा करताना दिसून येतील. सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. तत्पूर्वीच भाजपने प्रवासादरम्यान चर्चेची ही नवीन संकल्पना मांडली आहे. या कार्यक्रमासाठी भाजप कार्यकर्तांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची (Mission LokSabha 2024) माहिती समोर आली आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान भाजप कार्यकर्ते सर्वसामान्यांशी निगडीत मुद्यांवर चर्चा सुरू करतील. यासोबतच भाजप सरकारचे विशेष कार्य, जातीय-धार्मिक समीकरणे तसेच विशेष भागातील उमेदवारांच्या पर्यायांवर देखील सहप्रवाशांसोबत कार्यकर्ते चर्चा करतील. रेल्वे प्रवासादरम्यान भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोदी सरकारच्याकडून चालवण्यात येणाऱ्या योजनांचा प्रचार अधिक प्रभावी पद्धतीने करता येईल, असा विश्वास भाजपला आहे. याचअनुषंगाने कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देवून त्यांची टीम तयार केली जाईल. प्रत्येक प्रवासानंतर कार्यकर्त्यांकडून एक अहवाल प्रमुखांकडे सादर केला जाईल. सर्व अहवालांच्या विश्लेषणानंतर महत्वाच्या मुद्दयांवर २०१४ च्या निवडणुकीचे घोषणापत्र जाहीर केले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news