BJP’s Chief Minister: कोण होणार मुख्यमंत्री? ३ राज्यातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांची काँग्रेसलाच उत्सुकता

BJP’s Chief Minister: कोण होणार मुख्यमंत्री? ३ राज्यातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांची काँग्रेसलाच उत्सुकता
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: 'कोण होणार करोडपती'प्रमाणे 'कोण होणार मुख्यमंत्री' हा प्रश्न छत्तीसगड, मध्यप्रदेश राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. असे वक्तव्य छत्तीसगडचे मावळते मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले आहे. असेच काहीसे वक्तव्य राजस्थानचे मावळते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील केले आहे. ( BJP's Chief Minister)
देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यापैकी छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली तर केवळ तेलंगणामध्ये काँग्रेसला यश मिळवता आले. ३ डिसेंबरला निकाल लागल्यानंतर काँग्रेसने तेलंगणामध्ये रेवंथ रेड्डी यांना मुख्यमंत्री बनवले. भाजपला मात्र अजूनही त्यांची सत्ता आलेल्या राज्यात मुख्यमंत्री कोण असेल यावर शिक्कामोर्तब केले नाही. हाच धागा पकडत भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत यांनी भाजपवर टीका केली आहे. ( BJP's Chief Minister)
राजस्थानमधील भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबद्दल बोलताना काँग्रेस नेते आणि राजस्थानचे काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, निकाल लागून आता सात दिवस झाले आहेत. एवढ्या काळात भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू शकत नाही. जर काँग्रेसने एवढ्या काळात मुख्यमंत्र्यांची निवड केली नसती, तर भाजपने ओरड केली असती. गोगामेडी प्रकरणात मला कागदपत्रांवर सही करावी लागली. हे नवीन मुख्यमंत्र्यांनी करायला हवे होते. त्यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. असेही गेहलोत म्हणाले.  ( BJP's Chief Minister)
हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news