BJP News : भाजप नेत्यांच्या आजच्या बैठकीनंतर ठरणार छत्तीसगडचा नवा मुख्यमंत्री; नाव होणार स्पष्ट | पुढारी

BJP News : भाजप नेत्यांच्या आजच्या बैठकीनंतर ठरणार छत्तीसगडचा नवा मुख्यमंत्री; नाव होणार स्पष्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशसह राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. लोकसभा २०२४ ची सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाले. या निवडणुकांवरून लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, छत्तीसगडमध्येदेखील मुख्यमंत्री पदाचा दावेदार निवडीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे. भाजपचे महत्त्वाचे नेते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी छत्तीसगडमध्ये पोहोचले आहेत. दरम्यान, या बैठकीनंतर छत्तीसगड मुख्यमंत्री कोण असणार हे ठरणार आहे, असे भाजप नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (BJP News)

एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, भाजपचे केंद्रीय निरीक्षक अर्जुन मुंडा, छत्तीसगडचे निरीक्षक, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम आणि छत्तीसगड भाजपचे प्रमुख अरुण साओ यांची रायपूर येथील भाजप कार्यालयात बैठक भेट झाली. दरम्यान, त्यांच्यात छत्तीसगड मुख्यमंत्री पदाच्या दावेदारसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. (BJP News)

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे. दरम्यान पक्षाकडून तीन राज्यातील नेता (मुख्यमंत्री) निवडीसाठी निरिक्षकांची नियुक्ती केली आहे. या संदर्भातील माहिती भाजपने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून दिली आहे. (BJP News)

BJP News : तीन राज्यांत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण?

छत्तीसगडः छत्तीसगडमध्ये रमण सिंह, भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण साओ, रेणुका सिंह आणि ओपी चौधरी यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

राजस्थानः मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत वसुंधरा राजे, खासदार दिया कुमारी, ओम बिर्ला, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत आणि बाबा बालकनाथ यांची नावे आहेत.

मध्य प्रदेशः शिवराज सिंह चौहान, प्रल्हाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

हेही वाचा:

 

Back to top button