MP New CM : 'सभी को राम राम...' शिवराज सिंह चौहानांचा हात जोडलेला फोटो; ट्विटने खळबळ | पुढारी

MP New CM : 'सभी को राम राम...' शिवराज सिंह चौहानांचा हात जोडलेला फोटो; ट्विटने खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतरही भाजपला मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यात विलंब होत असल्याने पक्षांतर्गत संघर्षाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मध्य प्रदेशातील आमदारांची सोमवारी बैठक होणार आहे. नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेले माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या ‘X’ पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे चौहान मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान असले तरी भाजप राज्यात नवीन चेहरा देण्याच्या विचारात आहे. भाजपकडून मुख्यमंत्री बदल हा नक्की आहे. दरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी ‘सभी को राम राम…’ अशी पोस्ट करत आपला हात जोडलेला फोटो शेअर केला आहे. नवीन मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याआधी चौहान यांचे हे ट्विट चर्चेचा विषय बनला आहे.

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री निवडण्याची प्रक्रिया लांबत चालली आहे. राज्यात नवीन चेहरा देतानाच ओबीसी चेहराही हवा, असा भाजपच्या नेतृत्वाचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात भाजपला दणदणीत विजय मिळवल्याने चौहान यांचे पारडे जड असले तरी त्यांना पक्षातूनच विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशात सोमवारी नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button