पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने केले ३४० कोटी तर काँग्रेसकडून १९४ कोटी खर्च

पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने केले ३४० कोटी तर काँग्रेसकडून १९४ कोटी खर्च

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा – यावर्षी पाच राज्‍यांमध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपने ३४० कोटी तर काँग्रेसने १९४ कोटी रुपये खर्च केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाला या दोन्‍ही पक्षांनी निवडणूक खर्चाचा तपशील दिला होता. हा तपशील निवडणूक आयोगाने सार्वजनिक केला आहे.

भाजपचा सर्वाधिक खर्च उत्तर प्रदेशमध्‍ये

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीत केलेल्‍या खर्चाचा तपशील दोन्‍ही पक्षांनी निवडणूक आगोयाला दिला आहे. या राज्‍यांमध्‍ये भाजपने ३४० कोटी रुपये खर्च केला असून, उत्तर प्रदेशमध्‍ये सर्वाधिक २२१ कोटी रुपये खर्च केला आहे. तर मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि गोवामध्‍ये अनुक्रमे २३, ४३.६७, ३६, आणि १९ कोटी रुपये खर्च झाला आहे. काँग्रेसने पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीत १९४ कोटी रुपये खर्च केले.

लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविणार्‍या राजकीय पक्षांना ठराविक वेळेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवडणुकीत केलेल्‍या खर्चाचा तपशील देणे अनिवार्य असते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news