गोवा : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २२ बांगलादेशींना अटक; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई | पुढारी

गोवा : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २२ बांगलादेशींना अटक; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

पणजी; पुढारी वृत्तसेवा : दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी (दि. २१) व गुरुवारी (दि. २२) गोव्यातील विविध भागात बेकायदेशीरपणे राहणार्‍या २२ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. अद्यापही शोधमोहीम सुरू असल्याने आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.

Midnight operation : ‘पीएफआय’वर छापे, केंद्रीय तपास संस्‍थांनी ‘ऑपरेशन मीडनाईट’ कसे राबवले ?

एटीएसच्या पथकाने साखळी, वाळपई, डिचोली, कोलवाळ, वार्का व नावेली या भागांमध्ये बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. बुधवारी साखळी व वाळपई परिसरातील एकूण चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. बोगस आधार कार्ड तयार करून हे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे गोव्यामध्ये राहात होते. वाळपई येथे बिलाल अन्वर अखोन हा बांगलादेशी तब्बल १२ वर्षे येथे राहात होता. शोधमोहीम सुरू असल्यामुळे अद्यापही गोव्याच्या विविध भागांत असलेल्या बांगलादेशी नागरिक किंवा रोहिंग्याना अटक होण्याची शक्यता आहे.

‘पीएफआय’चा एक सक्रिय कार्यकर्ता ‘एएनआय’च्या ताब्यात

केंद्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) देशभरात १०६ पेक्षा जास्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांना अटक केली आहे. गोव्यामध्येही आज (दि.२२) मुरगाव तालुक्यातील बायणा येथील ‘पीएफआय’च्या एका सक्रीय कार्यकर्त्यांला ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर गोव्यात सक्रियपणे काम करणारे ‘पीएफआय’चे कार्यकर्ते पसार झाले आहेत.

हेही वाचा :

Back to top button