‘पैसा ही पैसा बाबू भैया’ : क्रिप्टोकरन्सी मालामाल; बिटकॉईनला रेकॉर्डब्रेक किंमत | Bitcoin
पुढारी ऑनलाईन डेस्क : आघाडीची क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉईनने शुक्रवारी विक्रमी किंमत मिळवली आहे. तेजीमुळे एका बिटकॉईनची किंमत शुक्रवारी रेकॉर्डब्रेक ७०,१३६ डॉलरवर पोहोचली होती. ही किंमतनंतर ६८,२४५.४८ डॉलर इतकी खाली आली. बिटकॉईनच्या या अभूतपूर्व तेजीमुळे टोकन मार्केटचे बाजारमूल्य १.३४ ट्रिलियन डॉलर इतके पोहोचले आहे. तर बिटकाईनची किंमत गेल्या काही दिवसात ६१.५७ टक्केंनी वधारली आहे. (Bitcoin)
संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून वाढती मागणी, बिटकॉईन EFTमध्ये झालेली वाढ आणि एप्रिलमध्ये नियोजित असलेले BitCoin Halving यामुळे किंमती वाढल्याचे लाईव मिंटने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. बाजारात १ कोटी ९० लाखाच्यावर बिटकॉईन आहेत, यातील ७० टक्के बिटकॉईनधारक असे आहेत, ज्यांनी वर्षाभरात बिटकॉईनची विक्रीच केलेली नाही, यातून दीर्घकालीन गुंतवणुकीचा कल लक्षात येतो. गेल्या २४ तासांत बिटकॉईन सातत्याने ६८,३०० डॉलरच्या वर ट्रेड करत होता. (Bitcoin)
बिटकॉईन का वधारले | Bitcoin
अमेरिकेतील अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्यानेही बिटकॉईनची किंमत वाढू लागली आहे. कोराना काळात व्याजदर कमी झाले होते, त्यामुळे लोकांना कर्ज काढून गुंतवणूक करणे सोपे झाले होते. नंतर रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर व्याजदर पुन्हा वाढले आणि बिटकॉईनची किंमत घसरू लागली. डिसेंबर २०२३मध्ये अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेरडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवणार नसल्याची घोषणा केली होती. महागाई कमी होत गेल्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत अशून जानेवारी महिन्यात अमेरिकेत ३ लाख ५३ हजार नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. तसेच जानेवारीत नऊ नवे बिटकॉईन ETF सुरू झाले. या ETFनी ट्रेंडिगच्या पहिल्या दिवशीच ४ अब्ज डॉलरची विक्री नोंदवली होती.
हेही वाचा