Birth Rate Issues In Japan : जपानचे घटते जन्मदर वाढवतोय जगाचं टेन्शन!

Birth Rate Issues In Japan : जपानचे घटते जन्मदर वाढवतोय जगाचं टेन्शन!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : असे भाकित वर्तवले जात आहे की २१०० साल येईपर्यंत जागतिक जन्मदर घटून ०.१ टक्के इतका कमी राहण्याची शक्यता आहे. मुलांचे घटते जन्म दर अशा पद्धतीने कदाचिप पुर्णपणे थांबेल. मग नेमके काय होईल ? या गोष्टी चिंता जागतिक स्तरावरील शास्त्रज्ज्ञांना आतापासून सतावत आहे. असे होऊ शकते की, मग काही काळाने या पृथ्वीवरुनच मानवाचे अस्त्विच पुर्णपणे नष्ट होईल. या दरम्यान अनेक बदल होतील, जे बदल खरोखरच भयावह असतील. जपानमध्ये सातत्याने घटनाऱ्या जन्मदरामुळे या सर्वांची चर्चा होऊ लागली आहे. स्वाभाविकच जपानच्या घटत्या जन्मदराने जगाला चिंतेत टाकले आहे. आज जरी याचा विचार कोणी करत नसेल पण, प्रत्येकाला याचा विचार उद्या तरी करावा लागेल. (Birth Rate Issues In Japan)

काय आहे जपानची परिस्थिती (Birth Rate Issues In Japan)

जवळपास १२ कोटी लोकसंख्या असणारा जपान देश जगातील एक श्रीमंत देश आहे. या देशाच्या सैन्य शक्तीवर कोणीही शंका उपस्थित करु शकत नाही. पण हा देश हळूहळू कमजोर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी अनेक माहिती समोर येत आहे की, जपान सैन्य भरतीसाठी वारंवार आवाहन करत आहे. त्याने आपले सैन्य बजेट सुद्धा वाढवले आहे. पण, अपेक्षित सैन्य भरती मात्र होत नाही. याचे कारण असे सुद्धा आहे की, मोठी लोकसंख्या वृद्ध आहे किंवा वृद्ध होण्याच्या वाटेवर आहे. ही एक बाजू झाली, दुसरीकडे जपानमध्ये युवांची संख्या इतकी कमी झाली आहे की, अनेक वृद्धांना रिटायर झाल्यानंतर सुद्धा अनेक काळ नोकरी करावी लागत आहे. शिवाय कंपन्या बाहेरील लोकांना बोलावून नोकऱ्या देत आहेत. अशीच स्थिती राहिली तर एक वेळ अशी येईल की, जपानी अदृश्य होतील अशी भिती खुद्द त्यांच्या पंतप्रधानांनी बोलून दाखवली.

जपानमध्ये सातत्याने घटत आहे जन्मदर

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या अहवालानुसार, मागील वर्षी जपानमध्ये ८ लाखाहून कमी (७,७३,०००) मुलांचा जन्म झाला आहे. असे या आधी कधीच झालेले नाही. आता तेथे सरकार मुलांच्या संगोपनासाठी पालकांना सुट्ट्यांसोबत मोठी रक्कम देण्याची योजना आखत आहे. आता ही परिस्थिती जपानची असली तरी जपान एकटा असा देश नाही ज्याला या समस्येने ग्रासले आहे. या जगात अनेक देश आहेत ज्यांच्या युवकांच्या संख्येत मोठ्याने घट होत आहे. हा झाला या समस्येचा एक भाग पण याच्या पुढील भाग आणखी भयावह आणि चिंता वाढवणारा आहे. (Birth Rate Issues In Japan)

जागतिक संस्था कोणता विचार करत आहेत

अमेरिका थिंक टँक, प्यू रिसर्च सेंटर या सारख्या जागतिक संस्थांचे म्हणणे आहे की आता हळूहळू जन्मदरातील घट ही अशीच वाढत राहिल. म्हणजे मुले जन्म घेण्याची प्रक्रियाच थंडावेल. वर्षे २१०० येईपर्यंत जगाची लोकसंख्या जवळपास १०.९ बिलियन झाली असेल. त्या नंतर या लोकसंख्येत ०.१ टक्क्यांहून कमीची वाढ होईल. (Birth Rate Issues In Japan)

ज्या दबावात आजकालची युवापिढी जगत आहे, त्यांच्यावरील असणारे प्रेशर पाहता एक काळ असा येईल की, जन्मदर घटत-घटत ती प्रक्रियाच थांबेल. मग कोणते नवे मुल या जगात येणार नाही. जी काही लोकसंख्या आहे ती तिथेच थांबेल आणि त्या नंतर काय होईल ?
ही एक बेबी – बॅन अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण मनुष्य काही काळासाठी किंवा समजा ५ दशकांसाठी मुले जन्मास घालणेच थांबवतील. या नंतर जे होईल त्याचा कोणीच विचार केला नसेल. आपली प्रजाती म्हणजे होमो सेपियन हळू – हळू नष्ट होऊ लागतील.

काहीच वर्षात निम्म्याहून कमी होईल लोकसंख्या

एक परिवर्तन असेही होईल की, बेबी – केअरसाठी निर्माण झालेले उद्योग एका रात्रीत संपून जातील. मिल्क पावडर, डायपर या सारख्या कंपन्या बंद होतील आणि लोक बेरोजगार होतील. यानंतर जो तणाव निर्माण होईल तो आणखी एक वेगळा मुद्दा असेल. पण, सध्या फक्त आपण इतका विचार करु की पुढे काय होईल. जर ५ दशकांपर्यंत एक ही मूल नाही जन्मले तर सध्या असणारी लोकसंख्या घटून ती निम्म्यावर म्हणजे ५ बिलियन इतकी होईल आणि इतकी लोकसंख्या १९८७ साली होती.

स्थलांतरात होईल वाढ

मुलाचे संगोपन करणे ही एक खर्चिक बाब आहे. तर जन्मदरच थांबले तर हा खर्च सुद्धा बंद होईल. त्यावेळी असणाऱ्यांपैकी सर्वांकडे शिल्लक पैसा असेल. याचा परिणाम इकोनॉमीवर सुद्धा हाईल. श्रीमंत देश अधीक श्रीमंत होईल आणि आपल्या इंडस्ट्री चालू ठेवण्यासाठी ते बाहेरच्या देशातून लोकांना बोलावतील. समजा, जपान सध्या वृद्धांची संख्या अधिक असणारा देश आहे. मात्र त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. अशात ते जर त्यांनी गरीब देशातील लोकांना अधिक दाम देऊन बोलावले तर ते लोक का येणार नाहीत. हे जपानसाठी चांगले असेल पण ज्या देशातून लोकांचे स्थलांतर झाले आहे त्याच्या इकोनॉमीवर संकट ओढावेल.

अशी सुद्धा भिती निर्माण होईल की, लोकांसाठी देश एकमेकांत भांडतील. आमुक देशाने आमच्या लोकांना बोलावून घेतले म्हणून तिसरे महायुद्ध सुद्धा भडकू शकते.

लिंग गुणोत्तरात होईल मोठा बदल

ज्यांची लहान मुले असतात अशा महिलांना अनेक तडतोड कराव्या लागतात. त्या नोकऱ्या सोडतात किंवा असे काम करतात ज्या त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी असेल किंवा असे काम ज्या त्या घरातून करु शकतील. जेव्हा मुलेच नसतील तर महिलांवरील दबाब हटेल आणि त्या पुरुषांबरोबरी हवे तसे काम करतील. असे होईल की त्या पुरुषांना देखील मागे टाकतील. असा बदल अनेक ठिकाणी वेगवेगळे बदल घडून आणू शकतात. जर मूल होणार नसेल तर स्त्री आणि पुरुषातील जैविक फरक सुद्धा संपून जाईल.

नामशेष होण्याचा धोका

शास्त्रज्ञ असेही मानतात की मनुष्य कायमस्वरुपी राहण्यासाठी पृथ्वीवर आलेला नाही. आपल्यातील म्हणजेच होमो सेपियन्स मधील जनुकीय भिन्नता खूपच कमी आहे. अनुवांशिक विविधता म्हणजे एकाच प्रजातीच्या व्यक्तींच्या जनुकांमधील फरक, त्यामुळे सजीवांमध्ये विविध जाती दिसतात. ही अनुवांशिक भिन्नताच आहे ज्याच्या मदतीने आपण किंवा कोणताही जीव नवीन हवामानाशी जुळवून घेतो आणि नामशेष होण्याचे टाळतो.

आपल्या डीएनएमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण फरक नसल्यामुळे कोणत्याही बदलाशिवाय आपल्यावर नामशेष होण्याचा धोका वाढत आहे. जसे की हे शक्य आहे की आपण ग्लोबल वॉर्मिंगचे पहिले बळी ठरु आणि मानव पृथ्वीवरून नष्ट होईल.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news