पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे मुंबई महापालिकेच्या सत्तेत असणार म्हणजे असणार. मी तुम्हाला खोटी आश्वासने देत नाही. हे मळभ लवकरच दूर होईल. आपण सत्तेपासून दूर राहणार नाही, अशी ग्वाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली. ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात आज (दि. ९) त्यांची सभा पार पडली. १७ व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
नाशिकच्या पुढच्या ५० वर्षांचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवला. नाशिकमध्ये काम करुन देखील लोकांनी नाकारणं हे दुर्दैव आहे. भरती ओहोटी येतेच, तरीही लढत राहणार, असे प्रतिपादन ठाकरेंनी केले. सत्ता नसताना देखील कार्यकर्त्यांनी ऊर्जा राखून ठेवली आहे. विधानसभा मनसे आमदारांनी भरली तर काय होईल? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
मराठीच्या मुद्द्यावरुन मोबाईल कंपन्यांचे पहिले ऑफिस ठाण्यात फुटलं. मनसेनेच मराठी चित्रपटांना थिएटर मिळवून दिले आहे. मराठी भाषेसाठी आंदोलन करावे लागणे हेच मुळात दुर्दैव आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
सध्या भरती चालू आहे, भाजपने देखील लक्षात घ्यावे असं म्हणत त्यांनी नॉट रिचेबल ही मोबाईल धुण वाजवली. मला आयोध्येला बोलावले होते. मला समजले होते आतील राजकारण काय आहे ते. अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
हेही वाचा