Satish Kaushik : सतीश कौशिक याच्या मृत्यूचे कारण आलं समोर; डॉक्टर म्हणाले... | पुढारी

Satish Kaushik : सतीश कौशिक याच्या मृत्यूचे कारण आलं समोर; डॉक्टर म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक आणि बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक ( Satish Kaushik ) यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या आकस्‍मिक निधनाने अनुपम खेर, पंकज त्रिपाठी, अक्षय कुमार अशा बॉलिवूड कलाकारांसह चाहत्यांवर शोककळा पसरली. त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आलं असून, त्याच्या मृत्यूचे कारण समोर आलं आहे.

अभिनेते सतीश कौशिक याच्या पार्थिवावर दिल्लीतील दीन दयाल रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण डॉक्टरांनी सांगितले की. सतीश याच्या मृत्तदेहावर जवळपास एक तासांहून अधिक काळ शवविच्छेदन करण्यात आलं आहे. प्राथमिक अहवालानुसार, मृतदेहावर कुठल्याही जखमा आढळल्या नाहीत. कार्डियक अरेस्टमुळे म्हणजे, हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सतीश यांचा मृतदेह एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईसाठी रवाना करण्यात आला आहे. मुंबईत त्यांच्या पार्थिव्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

कौशिक हे दिल्लीतील द्वारका सेक्टर-२३ येथील एका मित्राच्या घरी वास्तव्य आले होते. होळी साजरी केल्यानंतर ते तेथेच थांबले होते. दरम्यान, रात्री अचानक त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांनी व्यवस्थापक संतोष राय यांना फोन केला आणि रुग्णालयात नेण्यास सांगितले. यानंतर रायने त्यांना फोर्टिस रुग्णालयात घेवून गेले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : 

Back to top button