Toxic Liquor Deaths: Poisonous Liquor
Toxic Liquor Deaths: Poisonous Liquor

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये विषारी दारूमुळे हाहाकार माजवला आहे. मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १५ जणांवर मोतिहारी येथील सरकारी रूग्णालयात तर १४ जणांवर खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती मोतिहारी पोलिसांनी दिली आहे.

मोतिहारी जिल्ह्यातील हरसिद्धि, सुगौली, पहाडपुर, तुरकौलिया येथे विषारी दारू प्यायल्याने ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना १४ एप्रिलला घडली होती. तर २५ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. त्यातील मृतांची सख्या वाढली असून आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर मोतिहारी, पूर्व चंपारण्यचे पोलिस अधीक्षक कांतेश कुमार मिश्रा यांची अवैध दारू व्यवसायांवर छापेमारी सुरू आहे. गेल्या ३६ तासात ७६ दारू तस्करांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी २५ दारू तस्करांना घटना घडलेल्या परिसरातून अटक करण्यात आली असून ७३६.५ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. दरम्यान कारवाईत कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news