अतीक अहमद नावाची दहशत अखेर संपली! सतराव्या वर्षी केला होता पहिला मर्डर

अतीक अहमद नावाची दहशत अखेर संपली! सतराव्या वर्षी केला होता पहिला मर्डर
Published on
Updated on

प्रयागराज; वृत्तसंस्था :  प्रयागराजमध्ये गुंडगिरीच्या माध्यमातून राजकारणात वर्चस्व जमविणार्‍या अतीक अहमदचा अंत अखेर तसाच झाला. कितीतरी माणसे मारणारा अतीक गेल्या आठवड्यापासून माध्यमांसमोर मला ठार मारण्याचा डाव असल्याचा ठणाणा करत होता. अतीकचा गुंड-कम-राजकारणी भाऊ अशरफही दोन आठवड्यांच्या आत मला तुरुंगाबाहेर काढून ठार मारले जाईल, असे सांगत होता. सतत लोकांना भयाखाली ठेवणार्‍या या दोघा भावांची ही भीती अखेर खरी ठरली.

शनिवारी रात्री साडेदहा वाजता माध्यमांचे कॅमेरे ऑन असताना दोघांना ठार मारण्यात आले. पाल खून प्रकरणातील गुंडांचे एकापाठोपाठ यूपी पोलिसांनी एन्काऊन्टर केल्यानंतर जेव्हा अतीकच्या मुलाचाही याच क्रमात खात्मा झाला, तेव्हा अतीकच्या वाट्यालाही असाच मृत्यू येईल, हा एकुणात यूपीचा समज होता; पण अतीकचे एन्काऊन्टर पोलिसांनी केले नाही. कडेकोट पोलिस बंदोबस्त असताना अतीक व अशरफ असे दोघे माध्यमांशी बोलत असताना तीन युवकांनी मिळून अतीक आणि अशरफ या दोघांचा खात्मा केला. उमेश पाल हत्याकांडात अतीकला त्याच्या 44 वर्षांच्या दहशतीत पहिल्यांदा शिक्षा झाली. उमेश पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार राजू पाल हे अतीकच्या धमक्यांमागून धमक्यांनंतरही फितूर झाले नाहीत म्हणून अतीकच्या मुलाने इतर पंटरांसह त्यांची हत्या केली.

मुलाची भेट होणार; पण अशी…

अतीकला पोलिस एन्काऊन्टरमध्ये मरण पावलेल्या मुलाच्या अंत्यविधीतही सहभागाची परवानगी मिळाली नाही; पण आता मुलाच्या कबरीशेजारीच अतीक आणि अशरफलाही दफन केले जाईल.

एकेकाळच्या मित्राशी शत्रुत्व

अतीक अहमदने त्याचा भाऊ अशरफ याला समाजवादी पक्षाची उमेदवारी मिळवून दिली. एकेकाळी अतीकचा मित्र असलेला राजू पाल बसपमध्ये सहभागी झाला. मायावतींनी त्याला उमेदवारी दिली. राजू पाल जिंकला.

दिल्लीपर्यंत दबदबा

अतीकच्या सुटकेसाठी तेव्हा दिल्लीतून फोन आला होता, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्रात तेव्हा राजीव गांधी यांचे सरकार होते.

गुंडगिरीला ग्रहण, अस्त…

अशरफचा पराभव अतीकला स्वतःचाच पराभव वाटत होता. राजू पालचा मग अतीकने खून केला. पुढे 2007 मध्ये मायावतींचे सरकार आल्यानंतर अतीकच्या गुंडगिरीला ग्रहण लागले आणि योगी आदित्यनाथ सरकारमध्ये त्याचाच अस्त झाला.

टांगेवाल्याच्या पोटी जन्म

प्रयागराजलगत चकिया गावातील फिरोज अहमद या टांगेवाल्याच्या पोटी 1962 मध्ये अतीकचा जन्म झाला. अतीकने दहावीनंतर शिक्षण सोडले. तो लूटमार, अपहरण करू लागला.

आधी होता चांद बाबाचा दरारा

अतीक 17 वर्षांचा असतानाच 1979 मध्ये त्याने पहिला खून केला. या कालखंडात प्रयागराजमध्ये चांद बाबा या गुंडाचा दरारा होता. 1989 पर्यंत अतीकवर 20 गुन्हे दाखल झाले होते.

दरोडे, अपहरण, खून हे खेळ!

दरोडे, अपहरण, खून अतीकचा नित्याचा खेळ होता. मध्यंतरी अतीकला अटकही झाली. तेव्हा तो जेलमध्येच समांतर न्यायालय चालवायचा. मांडवलीच्या या खेळातही अतीकने उदंड कमाई केली.

20 गुन्ह्यांसह आमदार अतीक

1989 मध्येच तो पहिल्यांदाच आमदारही झाला. विशेष म्हणजे, चांद बाबा हा निवडणुकीत अतीकच्या विरोधात होता. आमदार झाल्यानंतर 3 महिन्यांतच अतीकने चांद बाबाचा खात्मा केला. पुढे 7 वर्षांनी अतीक हा चांद बाबाहून अधिक डेंजरस बनलेला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news