मोमोज खाण्‍याची पैज जीवावर बेतली! तरुणाचा मृत्‍यू

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पैज लावणे आणि ती जिंकण्‍यासाठी कोणतीही किंमत मोजली जाते. यातूनच अनेक दुर्घटना घडल्‍याचे आपण पाहतो. असाच एक प्रकार बिहारमध्‍ये घडला आहे. मोमोज खाण्‍याची पैज बिहारच्‍या तरुणाच्‍या जीवावर बेतली आहे, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे. ( Momo-eating challenge )

गोपालगंज येथील २५ वर्षीय तरुणाने गंमत म्‍हणून आपल्‍या मित्रांसोबत मोमोज खाण्‍याची पैज लावली. "मोमो-इटिंग चॅलेंज"मध्‍ये अधिक मोमोज खाल्‍याने तरुणाचा मृत्‍यू झाला. बिपिन कुमार पासवान असे त्‍याचे नाव आहे.

बिपिन कुमार हा मोबाईल दुरुस्‍तीचे काम करत असे. गुरुवारी तो नेहमीप्रमाणे आपल्‍या दुकानात गेला. येथे मित्रांनी त्‍याला कोण अधिक मोमोज खातो, अशी पैज लावली. अधिक प्रमाणात मोमोज खाल्‍ल्‍यानंतर पासवान बेशुद्ध पडले. त्‍याला तत्‍काळ रुग्‍णालयात दाखल केले. येथे उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. ( Momo-eating challenge )

वडिलांनी केला विषबाधेचा आरोप

माझ्‍या मुलावर विषप्रयोग झाला आहे. त्‍याच्‍या मित्रांनी त्‍याला विष दिले आहे, असा आरोप बिपिन कुमार पासवानच्‍या वडिलांनी केला आहे. आपल्या मुलाच्या मित्रांनी विष देवून हत्‍या केली. त्‍याला मुद्दाम मोमो खाण्याचे आव्‍हान दिले. मोमोज मधून त्‍याला विष दिले, असा आरोप त्‍यांनी केला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत असून वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news