JDU MLA Gopal Mandal : ‘जेडीयू’चे आमदार भोजपुरी गाण्‍यावर बारबालांसोबत थिरकले!, म्‍हणाले, ” म्‍युझिक वाजलं की…”

JDU MLA Gopal Mandal : ‘जेडीयू’चे आमदार भोजपुरी गाण्‍यावर बारबालांसोबत थिरकले!, म्‍हणाले, ” म्‍युझिक वाजलं की…”
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

एका विवाह समारंभात स्‍टेजवर भोजपुरी गाण्‍यावर बारबाला नाचत होत्‍या. यावेळी बिहारमधील जनता दल संयुक्‍तचे (जेडीयू) आमदार गोपाल मंडल ( JDU MLA Gopal Mandal ) कार्यक्रमस्‍थळी पाेहचले.  बाराबालांचा डान्‍स पाहताचा यांचा मूड एकदम बदलला. ते थेट स्‍टेजवर गेले. बारबालाचा हात पकडून मनसोक्‍त नाचले. यावेळी उपस्‍थितांनी त्‍यांच्‍या 'बेधूंद डान्‍स'चा व्‍हिडीओ चित्रीत केला. तो सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आणि यानंतर गोपाल मंडल यांच्‍यावर सावरासावरीची वेळ आली.

भागलपूरमधील फतेहपूर गावात एका विवाहाचे आयोजन करण्‍यात आले होते. आमदार गोपाल मंडल या कार्यक्रमाला उपस्‍थित राहिले. यावेळी 'दिलबर-दिलबर' गाण्‍यावर डान्‍स सुरु होता. म्‍युझिकचा आवाज ऐकला आणि आमदार महाशयाचे स्‍वत:वरच नियंत्रण सुटले. ते थेट स्‍टेजवर पोहचले. त्‍यांनी बाराबालाचा हात पकडून 'दिलबर-दिलबर' आणि 'बुलेट पर जीजा' या भोजपुरी गाण्‍यांवर बेधूंद डान्‍स केला.

JDU MLA Gopal Mandal : …तेव्‍हा मी स्‍वत:ला रोखू शकत नाही.

यावेळी बाराबालाचा हात पकडून नाचल्‍यानंतर गोपाल मंडल यांनी हातात माईक घेवून एक किस्‍साही सांगितले. ते म्‍हणाले, मागील काही दिवसांपूर्वी मुख्‍यमंत्री नितीशकुमार यांनी तुम्‍ही नेहमची नाचता का? असा सवाल केला. तेव्‍हा मी उत्तर दिलं की, "जेव्‍हा म्‍युझिक माझ्‍या कानावर पडतं तेव्‍हा मी स्‍वत:ला रोखू शकत नाही. मी बेकाबू होत थिरकतो. कलाकारला कोणीच नाचण्‍यापासून थांबवू शकत नाही".

यापूर्वीही आमदार गोपाल मंडल यांनी अनेक कार्यक्रमात आपल्‍या डान्‍सची झलक दाखवली आहे. मात्र त्‍यांच्‍या डान्‍सबदलचे प्रेम बिहारमध्‍ये चर्चेचा विषय ठरले आहे. नितीश कुमार यांनी त्‍यांच्‍या नाचण्‍यावर नाराजी व्‍यक्‍त केली तरीही त्‍यांना डान्‍स हा आपल्‍या जगण्‍यातील भाग असल्‍याचे सांगत आपल्‍या कृतीचे समर्थन केले आहे. आता या डान्‍सच्‍या छंदामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news