Bigg Boss 17 : बिग बॉस सीझन १७ ची घोषणा; ‘हे’ असतील स्पर्धक?

Salman khan
Salman khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉसचा १६ वा सीझन संपल्यानंतर आगामी सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. यानंतर आता व्या सीझनची ( Bigg Boss 17)  घोषणा निर्मात्यांनी केल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस सीझन १७'चे तीन प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहेत. तर दुसरीकडे या सीझनमधील काही स्पर्धकाच्या नावाची लिस्टदेखील जारी करण्यात आली आहे.

संबधित बातम्या 

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, ईशा मालवीय, ईशा सिंग, हर्ष बेनिवाल, बेबीका धुर्वे आणि समर्थ जुरेल यांची स्पर्धकाचा नावे असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, खरंच इतकेचं स्पर्धक आहेत की अजूनही आणखी काही आहेत? याबद्दल अजून माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसापासून आगामी बिग बॉस सीझनची चाहते प्रतिक्षा करत होते. दरम्यान नव्या प्रोमोसोबत निर्मात्यांनी १७ व्या सीझनची ( Bigg Boss 17) घोषणा केली आहे.

बिग बॉस १७च्या नव्या तिन्ही प्रोमोमध्ये सुत्रसंचालक सलमान खान वेगवेगळ्या तीन रुपात पाहायला मिळतोय. पहिल्यांदा बॉम्बशोधकाच्या रुपात, दुसऱ्यांदा गुप्तहेराच्या रुपात आणि तिसऱ्यांदा कव्वाली गायकाच्या रुपात दिसत आहे. दरम्यान सीझन १७ दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजीपासून चाहत्यांच्या भेटीस येत असल्याची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा सलमानला पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्याची उत्कंठा वाढली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

\

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news