पुढारी ऑनलाईन : 'बिग बॉस OTT २'चा १४ ऑगस्टच्या रात्री फिनाले झाला. ही रात्र खास बनली. कारण त्यात 'राव साहब' म्हणजेच यूट्यूबर एल्विश यादव (Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav) विजेता ठरला. सलमान खान या शोचा होस्ट आहे. एल्विश यादवला 'बिग बॉस ओटीटी २' च्या ट्रॉफीशिवाय २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. तर अभिषेक मल्हन फर्स्ट रनर-अप ठरला. तर मनिषा राणी तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
'बिग बॉस OTT २' चा विजेता बनून एल्विश यादवने (YouTuber Elvish Yadav) इतिहास रचला आहे. एल्विशने वाइल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एंट्री केली होती. त्याच्या विनोदी स्वभावामुळे आणि बोल्ड वर्तनामुळे बिग बॉसच्या घरात त्याने अधिराज्य गाजवले. बिग बॉसच्या १६-१७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच वाइल्डकार्डद्वारे प्रवेश करुन एखाद्या कंटेस्टंटनं शो जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बिग बॉस ओटीटी २ च्या फिनालेमध्ये सलमान खान यानेही सांगितले होते की, यावेळी जर एल्विश यादव जिंकला तर इतिहास घडेल आणि तसंच झालं. 'बिग बॉस ओटीटी २' मध्ये येऊन एल्विश यादवने बिग बॉसच्या घरातील सदस्यांसह शोची सिस्टम हादरवून सोडली. एल्विश यादवने त्याच्या वन लाइनर, गेम प्लॅन आणि रणनीतीने शो जिंकला. शोच्या इतर फायनलिस्टमध्ये मनिषा राणी, पूजा भट्ट आणि बेबीका धुर्वे यांचा समावेश होता.
वोटिंग आणि फॅन फॉलोइंगच्या बाबतीत अभिषेक आणि एल्विश यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. अंतिम फेरीत १५ मिनिटांसाठी लाइव्ह वोटिंग खुले करण्यात आले. ज्यामध्ये टॉप-२ अंतिम फेरीतील अभिषेक मल्हन आणि एल्विश यादव यांच्यासाठी मतदान झाले. सलमानने सांगितले की, एल्विश आणि अभिषेक यांच्यात वोटिंगसाठी चुरशीचा मुकाबला झाला.
'बिग बॉस ओटीटी २' चा विजेता फिनाले वीकमधील वोटिंगच्या आधारे निवडण्यात आला आणि फिनालेला १५ मिनिटांसाठी वोटिंग लाइन उघडण्यात आली होती. त्यात एल्विशने अभिषेक मल्हनचा पराभव केला. हरियाणातील गुरुग्रामचा असलेल्या एल्विश यादवने 'बिग बॉस OTT २' चा विजेता बनून इतिहास रचला आहे.
'बिग बॉस OTT २'ची १७ जूनपासून सुरूवात झाली होती. अभिषेक आणि मनीषा राणी यांच्यासह शोमध्ये जद हदीद, पूजा भट्ट, जिया शंकर, बेबिका धुर्वे, सायरस ब्रोचा, आकांक्षा पुरी, अविनाश सचदेव, पलक पुरसवानी, फलक नाज आणि आलिया सिद्दीकी सारखे स्पर्धक होते. पण काही आठवड्यांनंतर एल्विशने वाइल्डकार्डद्वारे एंट्री करून बिग बॉस घराची 'सिस्टीम' बदलून टाकली. 'बिग बॉस'मध्ये एल्विश यादव विजेता बनेल, असे कोणालाही वाटले नव्हते.
एल्विशकडे दोन चॅनेल आहेत. एक 'एल्विश यादव व्लॉग्स' आणि दुसरा 'एल्विश नावाने आहे. दोन्ही चॅनल्सवर ४७ लाख आणि १० लाख सब्सक्रायबर आहेत. यूट्यूबर एल्विश यादवचे कुटुंबीय वजीराबाद गावात राहतात. तो फाउंडेशनदेखील चालवतो. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार, तो 'सिस्टम क्लोदिंग'चा संस्थापक आहे. एल्विशला लक्झरी लाईफसाठीदेखील ओळखले जाते. महागड्या गाड्यांचा तो शौकिन आहे. त्याने वर्ना, फॉर्च्युनर, पोर्श गाडी खरेदी केल्या आहेत. लक्झरी गाडीची किंमत १.७५ कोटी रुपये आहे. याशिवाय गुरुग्राममध्ये त्याचे अनेक फ्लॅट आहेत.
हे ही वाचा :