Gauri Kulkarni : ‘आई कुठे काय करते’ फेम गौरीच्या साखरपुड्याची रंगली चर्चा?; सत्य काय आहे

Gauri Kulkarni
Gauri Kulkarni
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' मालिकेतून 'गौरी' नावाचे पात्र चाहत्यांच्या घराघरांत पोहोचले आहे. गौरीची भूमिका अभिनेत्री गौरी कुलकर्णीने ( Gauri Kulkarni ) उत्तमरित्या साकारली आहे. दिवसेंदिवस मालिकेत नवनविन ट्विस्ट येत आहेत. दरम्यानच गौरी कुलकर्णीने गुपचूप पद्धतीने साखरपुड्या उरकल्याची चर्चा रंगली आहे. परंतु, तिने खरचं साखरपुडा केला आहे की नाही? याबद्दल अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही.

संबधित बातम्या 

अभिनेत्री गौरी कुलकर्णीने ( Gauri Kulkarni ) तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत गौरी तिच्या तोंडावर हात ठेवून कॅमेऱ्याकडे एकटक पाहताना दिसतेय. तर दुसऱ्या फोटोत तिच्या हातात हिऱ्याची अंगठी स्पष्टपणे दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'इट्स हॅपनिंग' असेही लिहिले आहे. यावरून गौरीने कोणालाही न सांगता गुपचूप पद्धतीने साखरपुड्या उरकल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, खरंच गौरीचा साखरपुड्या झाला आहे की नाही? याबद्दलची अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच काही दिवसापूर्वी गौरीचा वाढदिवस झाला आणि यानंतर लगेच साखरपुड्याची माहिती मिळाल्याने चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. 'गौरीने गुपचूप साखरपुड्या उरकलाय', 'नवऱ्याचे नाव काय?', 'कोण होणार आहे गौरी पती' यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. मात्र, अद्याप गौरीने अजूनही याबाबतचा खुलासा केलेला नाही.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri? (@gaurikulkarni23)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news