Bigg Boss OTT 2: पूजा भट्टची जीभ घसरली, जिया शंकरवर…

जिया शंकर - पूजा भट्ट
जिया शंकर - पूजा भट्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खानचा रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी २' सध्या खूप चर्चेत आहे. घरात या आठवड्यात स्पर्धकांच्यामध्ये मोठे भांडण होताना दिसते. (Bigg Boss OTT 2) घरात काहीतरी नवीन दाखवण्यासाठी निर्मात्यांनी आशिका भाटिया आणि एल्विश यादवची वाईल्ड कार्ड एन्ट्री दाखवली आहे. एल्विशने घरात येताच गेम सुरू केलं. त्याने आल्याबरोबर अविनाशला ऐकवलं. अविनाश भडकलेला पाहून फलकने त्याची बाजू घेतली. पूजा भट्ट फलकल समजवायला गेली. हा वाद जिया शंकरवर येऊन थांबली. (Bigg Boss OTT 2)

जियावर भडकली पूजा भट्ट

घरवाल्यांना एक टास्क देण्यात आले होते. ज्यानंतर पूजा भट्टने फलक नाजला समजावलं. ती जियापासून दूर राहण्यास सांगते. पूजा म्हणते, जियाची मैत्री प्रत्येक आठवड्याला बदलते. आधी ती मैत्री करते, मग, त्यालाच नॉमिनेट करते. भांडण करते मग क्षणात बेबी फेस बनवून मनधरणी करते. ती कॉर्नर जाली तर रडणे सुरु करते.

स्लो पॉईझन आहे जिया

पूजा इथेच थांबत नाही. ती बेडरूम एरियामध्ये अविनाश, फलक आणि जद हदीदसमोर जिया शंकरची पोल खोल करते. पूजा, जियावर आरोप लावते. ती म्हणते, जिया सर्वांचा वापर करून घेते. मागे सर्वांना नावं ठेवते. ती एक स्लो पॉईझन आहे. खूप टॉक्सिक आहे. ती आपल्या स्वभावामुळे सर्वांना राग आणते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news