पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस ओटीटी 2 (BB OTT 2) मध्ये फॅमिली वीक ट्रेक दाखवण्यात आलं. शोमध्ये महेश भट्ट मुलगी पूजा भट्टला सपोर्ट करण्यासाठी पोहोचतात. यावेळी महेश भट्ट यांनी अनेक महिला कंटेस्टेंटची भेट घेतली. पण, त्यांची भेट ट्रोलर्सच्या पचनी पडली नाही आणि त्यांनी महेश भट्ट यांना ट्रोल करण्याची एक संधी देखील सोडली नाही. (BB OTT 2)
बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीजन फॅन्सना खूप आवडत आहे. सलमान खान या रिॲलिटी शोमध्ये प्रत्येक दिवशी काही तरी नवीन हंगामा पाहायला मिळत आहे. शोमध्ये फॅमिली वीक सुरु आहे. सर्व कंटेस्टेंट्सचे घरवाले बिग बॉसच्या घरात येऊन पोहोचले. महेश भट्टदेखील पूजा भट्टला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान, मनीषा रानी आणि बेबिका धुर्वेसह दोन महिला कंटेस्टेंट्ससोबतचे त्यांचे वर्तणूक काही सोशल मीडिया युजर्सना अजिबात आवडलं नाही.
इंटरनेटवर महेश भट्ट् यांचा एक व्हिडियो व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये महेश भट्ट घरात एंट्री करतात. मनीषा रानी धावत त्यांना भेटायला जाते. मनीषा आशीर्वाद घेण्यासाठी महेश भट्ट यांचे पदस्पर्श करते. पण त्यानंतर उलट महेश भट्ट मनीषा राणीचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्न करतात. त्यानंतर तिच्य़ा खांद्याला स्पर्श करत म्हणतात की, 'माझ्या वयाचा कधीही अपमान करू नका.' मनीषा खूप उत्सुक होते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते.
तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये महेश भट्ट मनीषाच्या जवळ बसलेले दिसतात. मग ते मनीषा रामीचा हात धरतात. पूजा भट्ट ही महेश भट्ट यांच्याजवळ मनीषा रानीचे कौतुक करताना दिसते. आणि त्यांना बालपणीच्या गोष्टी सांगते. हे सर्व ऐकून महेश भट्ट मनीषाचा हात आपल्या हातावर ठेवतात. त्यानंतर ते मनीषा रानीच्या हातावर किस करतात.
महेश भट्ट यांची वर्तणूक पाहून युजर्स भडकतात. एका युजरने लिहिलं की, हे सर्व पाहून इतकं अस्वस्थ वाटतंय, मनीषाला कसं वाटलं असेल. आणखी एकान म्हटलंय-मनीषा राणीला महेश भट्टला अशा प्रकारे स्पर्श करणे आवडलेले नाही.