बिग बॉस मराठी 4- day 15 | अपूर्वा आणि विकासची नोकझोक

apurva nemalekar
apurva nemalekar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कालपासून बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा आणि विकासची नोकझोक दिसून येत आहे. कालदेखील अपूर्वाने विकासला बजावले की, 'जर मला तुझ्याविषयी काही चुगली आली तर मी आहे आणि तू आहे… माझ्यासारखी वाईट कोणी नाही.' (बिग बॉस मराठी 4) आजपण दोघांमध्ये मजेशीर गप्पा बघायला मिळणार आहेत. अपूर्वाने विकासला सांगितले' "पुढच्या वेळेस मी जीपण ड्युटी घेईन ती नाही घेतलीस तर मी तुझे आभार मानेन". (बिग बॉस मराठी 4)

विकासचे त्यावर म्हणणे आहे, "जेवण मग …? त्यावर अपूर्वाने बजावले, "विचार पण नाही करायचा. मी खरंच सांगते माझ्याबरोबर किचन नाही. मी अशी सुगरण नाहीये. मी आधीच सांगते आहे. विकास मित्रा मला खात्री आहे एक दिवस टास्कमध्ये तू मला पण उचलशील. या घरात कुठलाही पुरुष उचलू नाही शकतं, तरी तू मला उचलशील. ज्याअर्थी तू माझी बॅग उचललीस त्याअर्थी…" विकास म्हणाला, "मला पण वाटतं आहे…" त्यावर अपूर्वाने विकासाला दिले भन्नाट उत्तरं "पण ही संधी मी तुला देणार नाही." हे ऐकताच सगळ्यांना घरात हसू फुटले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news