महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात लवकरच मोठा फेरबदल होणार : भाजप राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष दिलीप घोष

भाजपचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष दिलीप घोष.
भाजपचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष दिलीप घोष.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संकटात आहे. शरद पवार पक्षावरील आपली पकड गमावत आहेत. पवार ज्‍या कार्यपद्धतीने पक्ष चालवत होते ती धोक्‍यात आली आहे. लवकरच महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात मोठा बदल होणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष दिलीप घोष यांनी माध्‍यमांशी बोलताना केली. ( Sharad Pawar and Maharashtra politics)

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदावरुन निवृत्त होत असल्‍याची घोषणा शरद पवारांनी मंगळवारी (दि.२ ) केली होती. त्‍यांच्‍या या घोषणेने महाराष्‍ट्रातील राजकारणात भूकंप आला. पवारांनी घेतलेल्‍या निर्णयावर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्‍या प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या आहेत. याबाबत माध्‍यमांशी बोलताना भाजपचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष दिलीप घोष यांनी भूमिका स्‍पष्‍ट केली. ( Sharad Pawar and Maharashtra politics )

Sharad Pawar and Maharashtra politics : महाराष्ट्रात मोठा बदल होणार

या वेळी दिलीप घोष म्‍हणाले की, "महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात अनेक दिवसांपासून गोंधळ सुरु आहे. काही बोलणी सुरु आहेत. राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले आहे, शरद पवार आपली पक्षावरील पकड गमावत आहेत. याचा परिणाम शरद पवार यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदावरुन निवृत्त होण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यांनी निवृत्ती होणार असल्‍याची घोषणा केल्‍यामुळे महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात मोठा फेरबदल होणार आहे."

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news