Sharad Pawar Resign : शरद पवार यांच्याकडे भविष्याची योजना असेल – तारिक अन्वर | पुढारी

Sharad Pawar Resign : शरद पवार यांच्याकडे भविष्याची योजना असेल - तारिक अन्वर

नवी दिल्ली, 02 मे, पुढारी वृत्तसेवा – शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शरद पवार विचार न करता कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यांच्याकडे भविष्यासाठी काहीतरी योजना निश्चित असेल.

अन्वर हे पवारांचे दीर्घकाळ सहकारी राहिले आहेत. सुमारे 25 वर्षांपूर्वी पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा अन्वर हे त्याचे संस्थापक सदस्य होते.

पवार यांच्या निर्णयाबाबत विचारले असता अन्वर म्हणाले की, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून प्रत्येक नेत्याला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. अंतर्गत बाब काय आहे, आम्हाला माहिती नाही, असेही ते म्हणाले. माझ्या माहितीप्रमाणे ते कोणताही निर्णय पूर्णपणे विचार करूनच घेतात. त्याशिवाय ते कोणताही निर्णय घेत नाही. ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि भविष्यासाठी त्यांच्याकडे काही योजना असतील. काय करायचं हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

पवारांच्या योगदानाबाबत अन्वर म्हणतात, देशाच्या राजकारणात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी विरोधकांच्या आवाजाची भूमिका बजावत विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही केला.

हे ही वाचा :

Sharad Pawar News | शरद पवार यांच्या निवृत्तीची ‘ही’ आहेत ५ कारणे?

शरद पवार यांच्या आत्मचरित्रावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवारांच्‍या निवृत्तीच्‍या निर्णयाचा अर्थ काय? राजकीय विश्‍लेषक म्‍हणतात…

Back to top button