भिवंडी : केमिकलच्या साठ्याला भीषण आग

भिवंडी : केमिकलच्या साठ्याला भीषण आग
Published on
Updated on

भिवंडी ; पुढारी वृत्‍तसेवा : आज बुधवार पहाटे ०७: ३७ वाजण्याच्या सुमारास भिवंडी ग्रामीण, दापोडे, मानकोली नाक्याजवळ, इंडियन कार्पोरेशन कॉम्प्लेक्स मधील इमारत क्रमांक-१८९ या इमारतीच्या तळ मजल्यावरील गाळ्याला आग लागली. या गाळ्यामध्ये लाकडी वस्‍तूंच्या शायनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलचा साठा होता. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या विषयी अधिक माहिती अशी की, आज पहाटे भिवंडी ग्रामीण, दापोडे, मानकोली नाक्‍याजवळ इंडियन कॉर्पोरेशन कॉम्‍पलेक्‍स मधील गाळा क्रमांक-७ (मालक:- मनकू हरी सिंग, भाडोत्री :- गणेश गायकवाड) या लाकडी वस्तूंना शायनिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलचा साठा असलेल्या गाळ्यामध्ये आग लागली.

या घटनेच्या माहितीनंतर भिवंडी अग्निशमन दलाचे जवान २-फायर वाहनांसह घटनास्‍थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवीण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच कोणतीही जीवितहानीही झालेली नाही, असे भिवंडी अग्निशमन केंद्रातून माहिती देण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news