स्मार्त आणि भागवत एकादशी एकाच दिवशी, वारकरी सांप्रदायाप्रमाणे भागवत एकादशी कोणत्या दिवशी, जाणून घ्या

पंढरपूर तीर्थक्षेत्र विठ्ठल मंदिर
पंढरपूर तीर्थक्षेत्र विठ्ठल मंदिर

पंढरपूर: पुढारी वृत्‍तसेवा : पंचांगात शनिवार, १ एप्रिल रोजी कामदा एकादशी तर रविवारी २ एप्रिल रोजी द्वादशी समाप्ती आहे. ज्या गावात २ एप्रिल रोजी सकाळी ६.२५ वाजण्यापूर्वी सूर्योदय होत असेल तेथे द्वादशी तिथीची वृद्धी होत असल्याने स्मार्त आणि भागवत अशा दोन एकादशी एकाच दिवशी असणार आहेत. ६.२५ वाजण्यापूर्वी सूर्योदय होत रविवारी भागवत एकादशी असेल, असे दाते पंचांगात उल्लेख आहे. आळंदी देवाची येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने वारकरी सांप्रदायाच्या परंपरेप्रमाणे रविवारी, २ एप्रिलला भागवत एकादशी करण्याचे आवाहन केले आहे.

पंचांगातील असलेल्या ठिकाणी दोन शनिवारी स्मार्त आणि एकादशीच्या उल्लेखाचा संभ्रम दूर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, शिर्डी, मालेगाव, बारामती, फलटण, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण कोकण प्रदेश, संपूर्ण गोवा, संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगावी, गोकाक, कारवार, मंगळुरू, उडुपी, शिरसी, राजस्थानातील उदयपूर, जोधपूर, बिकानेर या प्रदेशात शनिवारी, १ एप्रिल रोजी एकच एकादशी आहे. सूर्योदयाच्या वेळेनुसार पंचांग असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. रविवारी एकादशी करण्याचे आवाहन करून वारकरी सांप्रदायाने हा संभ्रम दूर केला आहे.

दोन एकादशी असलेली काही प्रमुख गावे महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूरसह अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, संपूर्ण मराठवाडा व संपूर्ण विदर्भ, कर्नाटकातील हुबळी, धारवाडसह विजयपूर, कलबुर्गी, होसपेट, बागलकोट, गदग, हावेरी, मैसूर, बेंगळुरू, संपूर्ण मध्यप्रदेश, राजस्थानातील जयपूर, अजमेर, संपूर्ण हरियाणा व पंजाब या प्रदेशामध्ये शनिवारी १ एप्रिल रोजी स्मार्त आणि रविवारी २ एप्रिल रोजी भागवत एकादशी आहे, असा उल्लेख दाते पंचांगामध्ये आहे. वारकरी सांप्रदाय भागवत एकादशी मानत असल्याने रविवारी एकादशी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news