भाभीजी घर पर हैं मालिकेत नवीन अनिता भाभीची धमाकेदार एन्ट्री

भाभीजी घर पर हैं मालिकेत नवीन अनिता भाभीची धमाकेदार एन्ट्री

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

भाभीजी घर पर हैं ही लोकप्रिय मालिका चर्चेत आहे. कारण पुन्हा एकदा अनिता भाभीचे पात्र बदलण्यात आले आहे. विभूती नाराय, (आशिफ शेख), तिवारी जी म्हणजेच (रोहितश्व गौड) आणि 'अंगूरी भाभी' (शुभांगी अत्रे) अनेक वर्षांपासून लोकांची मने जिंकत आहेत. पण, आता भाभीजी घर पर हैं मालिकेत अनिता भाभीची भूमिका दुसरी अभिनेत्री साकारणार आहे.

विदिशा श्रीवास्तव
विदिशा श्रीवास्तव
विदिशा श्रीवास्तव
विदिशा श्रीवास्तव

या अभिनेत्रीचे नाव आहे-विदिशा श्रीवास्तव. तिने सध्या सुरू असलेली टीव्ही मालिका काशीबाई बाजीराव बल्लाळमध्ये काम केलं आहे. या मालिकेत तिने शिवूबाईची भूमिका साकारलीय. विदिशाने ए हैं मोहब्बते मालिकतही काम केलं आहे. तिचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे २८ एप्रिल, १९८६ रोजी झाला.

विदिशा श्रीवास्तव
विदिशा श्रीवास्तव

तिने बिझनेस मॅनेजमेंटशिवाय बायोटेक्नॉलजीचा कोर्सदेखील केलाय. पण, विदिशाला अभिनेत्री व्हायचं होतं. त्यामुळे तिने आपले शिक्षण पूर्ण करून मॉडलिंग केले. २००७ मध्ये तिने चित्रपटांमध्ये करिअरला सुरुवात केली. तिने तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलंय.

विदिशा श्रीवास्तव
विदिशा श्रीवास्तव

विदिशाला 'टीव्हीची यामी गौतम'दखील म्हटलं जातं. कारण, ती बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमसारखी दिसते. विदिशाने 'ये जादू है जिन्न का', 'तुझसे है राब्ता', 'मेरी गुडिया' आणि 'श्रीमद भगवत महापुराण' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय. 'कहत हनुमान जय श्रीराम' मध्ये तिने देवी पार्वतीची भूमिका साकारली होती.

विदिशा श्रीवास्तव
विदिशा श्रीवास्तव

या नव्या मालिकेची सुरुवात मलखान आणि टिल्लूने होते. हप्पू सिंग विचारतो की काल काय पाहिलं? मात्र तिघेही रात्री दारूच्या नशेत असल्याने त्यांना काहीच आठवत नाही. तेव्हा टिका म्हणतो की, मला काहीतरी आठवतयं. लंडन विमानतळाबद्दल कोणीतरी काहीतरी बोलताना ऐकले. हप्पू सिंग म्हणतो काहीतरी आठवण्याचा प्रयत्न कर. टिका म्हणतो की, मला आठवते की अनिता भाभीसोबत विभूती होते.

विदिशा श्रीवास्तव
विदिशा श्रीवास्तव

दुसरीकडे, तिवारी जी आणि अंगूरी भाभी, हप्पू सिंग आणि टिका, मलखान आणि टिल्लू सर्वजण विभूतीच्या घराबाहेर जमतात. विभूतीजी म्हणतात, मी शपथ घेतो की मी काहीही केले नाही. हप्पू सिंग म्हणतो की, जर माझे डोके फिरले तर मी तुझा येथेच एन्काऊंटर करेन. विभूती म्हणतो जेव्हा मी काहीच केले नाही तर मग तुम्ही माझं एन्काऊंटर कसे करू शकता.

विदिशा श्रीवास्तव
विदिशा श्रीवास्तव

सध्या सर्वजण वाद घालत आहेत. अंगूरी भाभी अनिता भाभीला समोरून रिक्षावरून येताना पाहाते. नाचत अनिता भाभीची धमाकेदार एन्ट्री होते. मात्र, डान्स करताना ती फक्त तिवारीजींनाच दिसते.

विदिशा श्रीवास्तव
विदिशा श्रीवास्तव

हेदेखील वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news