‘द कश्मीर फाईल्स’ची जोरदार कमाई सुरूच | पुढारी

‘द कश्मीर फाईल्स’ची जोरदार कमाई सुरूच

नवी दिल्ली :

विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ने सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलेच वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या चित्रपटासमोर मोठमोठ्या स्टार कलाकारांच्या चित्रपटांना यश मिळेनासे झाले आहे, असे दिसत आहे. सध्या हा चित्रपट रोज कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. रीलिज झाल्यापासून अकराव्या दिवशीही हा चित्रपट गर्दी खेचत आहे. असे असले तरी कमाईच्या बाबतीत थोडा परिणाम झाला आहे. ऑनलाईन लिक होणे, अशी काही कारणे यास जबाबदार आहेत. तरीही या चित्रपटाने आतापर्यंत 179.85 कोटी रुपयांची घशघशीत कमाई केली आहे. या आठवड्यात ‘द कश्मीर फाईल्स’ हा 200 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. चित्रपटाचे बजेट केवळ 14 कोटींचे होते. या चित्रपटाने राधे-शाम, गंगुबाई काठियावाडी आणि बच्चन पांडे या बिग स्टारर चित्रपटांना मागे टाकले आहे.

Back to top button