Benefits Of Papaya peel : पपईच्या साली फेकून देऊ नका, चेहरा चमकणारचं; असा करा उपयोग

papaya
papaya

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण पपई खाल्ल्यानंतर फळाची साल फेकून देतो. पण, याच सालीचे भरपूर फायदे आहेत, जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील. पपईच्या सालीत जे औषधी गुणधर्म असतात. (Benefits Of Papaya peel) त्याचे खूप फायदे आहेत. सौंदर्यासाठीच नाही तर चेरी करण्यासाठीही पपईच्या सालीचा उपयोग केला जातो. जसे पपई खाणे हे शरीरासाठी चांगले तसे त्याचे अनेक उपयोग आहेत. (Benefits Of Papaya peel)

Papaya
Papaya

पपई खाल्ल्यानंतर त्याची साल पाण्याने स्वच्छ धुवा. ती मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्या. पेस्ट एका वाटीत घेऊन त्यात अर्धा चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. तुम्हाला जर हळद सूट होत असेल तर हळदही घालू शकता. सर्व मिश्रण एकत्र करून घ्या.

आता चेहरा आणि मान पाण्याने स्वच्छ धुवा. एका सूती टॉवेलने चेहरा कोरडा करून घ्या. तयार केलेली पेस्ट ब्रशने किंवा हाताने चेहऱ्याला आणि मानेला लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर वाळेपर्यंत थांबा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि मानेवर वाळेपर्यंत थांबा. वाळल्यानंतर पाण्याने धुवून टाका. यामुळे तुमच्या मानेवरील आणि चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होईल. तसेच चेहऱाही चमकेल.

पपईची साल वाळवा. नंतर तिची बारीक पावडर करून एका हवा बंद बरणी किंवा बाटलीत भरून ठेवा. एक चमचा गुलाबी पाणी, थोडे दूध आणि थोडे मध घेऊन पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा. वाळल्यानंतर धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी व्हायला मदत होईल.

केसांसाठाही पपई अतिशय फायदेशीर आहे. दोन आठवड्यातून एकदा पपई खायला हरकत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news