Benefits OF Amla and Honey : आरोग्यासाठी गुणकारी आहे आवळा व मध

Benefits OF Amla and Honey
Benefits OF Amla and Honey
Published on
Updated on

नवी दिल्ली ः आवळा आणि मध हे दोन्ही आपल्या औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. या दोघांना एकसाथ सेवन केल्यास हे एक चांगले आरोग्यदायी मिश्रण बनते, जे अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्यास मदत करते, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे. चला जाणून घेऊ या, आवळा आणि मध एकत्रित सेवन केल्यास कोणते लाभ होतात….

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

आवळा व्हिटॅमिन'सी' चा एक समृद्ध स्रोत आहे. जो आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रमुख भूमिका निभावतो. तसेच मध अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुणांनी परिपूर्ण असते. जे संक्रमणशी लढायला मदत करते. आवळा आणि मधाचे एकत्रित सेवन शरीराला आजरांपासून दूर ठेवते.

पाचन तंत्र सुरळीत ठेवते

आवळ्यामध्ये असलेले फायबर पाचन तंत्र सुरळीत ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता, अपचन, अ‍ॅसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम देते. जे पोटातील अल्सरवर देखील उपयोगी आहे.

त्वचेसाठी फायदेशीर

आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट त्वचेतील मुक्तकणांना होणार्‍या नुकसानपासून वाचवते. तसेच सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. तसेच मध त्वचेला नैसर्गिकरीत्या मऊ ठेवते.

केसांसाठी फायदेशीर

आवळा केसांसाठी एक नैसर्गिक कंडिशनर आहे, जो केसांना मजबूत बनवतो. आवळा केस गळती थांबवतो. तसेच केसांना दाट आणि चमकदार बनवतो. तसेच मध केसांना पोषण देते.

वजन कमी करण्यासाठी उपयोगी

आवळा आणि मध दोन्ही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. आवळा चयापचय क्रियेला वाढवतो तसेच कॅलरी कमी करण्यास मदत करतो.

खोकला आणि सर्दीपासून आराम

आवळा आणि मध दोन्ही खोकला आणि सर्दीसाठी उपयोगी आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट खोकला आणि सर्दीच्या लक्षणांना कमी करतात. मध गळ्यातील खवखव कमी करते आणि खोकल्यापासून आराम देते.

अ‍ॅनिमियापासून बचाव

आवळा आयर्नचा एक चांगला स्रोत आहे. जो अ‍ॅनिमिया दूर ठेवण्यासाठी मदत करतो. तसेच मध शरीरातील आयर्नचे प्रमाण वाढवते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news