बेळगाव : टेंपो-दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार

बेळगाव : टेंपो-दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार

चिकोडी; काशिनाथ सुळकुडे : टेंपो व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे युवक जागीच ठार झाले. ही घटना चिकोडी तालुक्यातील बसवनाळगड्डे येथे मंगळवारी रात्री घडली. प्रशांत भैरू खोत (वय 33), सतीश कलाप्पा हिरेकोडी (वय 32), यलगौडा चंद्रकांत पाटील (वय 33) तिघेही रा. केरूर, अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

सदर तरुण दुचाकीवरून चिकोडीकडून केरूर गावाकडे जात असताना चिकोडी-अंकली रस्त्यावरील बसवनाळगड्डे नजीक टेंपो व दुचाकीत भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले, तर एकचा इस्पितळात घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चिकोडी पोलिस स्थानकाचे पीएसआय अमिनभावी यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी चिकोडी ट्रॉफिक पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news