पुणे : वाहनाच्या धडकेने डिलिव्हरी बॉयचा मृत्यू | पुढारी

पुणे : वाहनाच्या धडकेने डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होता. योगेश गजेंद्र काजळे (वय 19, रा. बालेवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथील विश्व पेट्रोलपंपाच्या समोर घडली आहे. याप्रकरणी, योगेश याचा मावसभाऊ बबलू मोरे (वय 22, रा. मोरेवस्ती, चिखली) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश हा दुचाकीवरून पुणे-सोलापूर महामार्गाने निघाला होता. त्या वेळी उरुळी कांचन परिसरात एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला जोरात धडक दिली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.

Back to top button