बीड : आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतले शरद पवार यांचे आशीर्वाद

आमदार संदीप क्षीरसागर
आमदार संदीप क्षीरसागर

बीड, पुढारी वृत्तसेवा राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर कोणता आमदार कोणासोबत कोणता पदाधिकारी कोणत्या गटात अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. अद्याप राज्यभरातील चित्र स्पष्ट झालेले नाही. असे असताना अनेक आमदारांची व पदाधिकाऱ्यांची भूमिका संदिग्ध आहे.

बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मात्र रविवारीच मी साहेबांसोबतच अशी पोस्ट करून ते शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर आज (सोमवार) गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून व शरद पवारांसोबत आपण असल्याचे स्पष्ट करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुणे येथे खासदार शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यामुळे संदीप क्षीरसागर हे शरद पवारांना सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news