अजितदादा गटात असलेल्या नीलेश लंकेंच्या ‘त्या’ ट्वीटने चर्चेला उधाण | पुढारी

अजितदादा गटात असलेल्या नीलेश लंकेंच्या 'त्या' ट्वीटने चर्चेला उधाण

पुढारी ऑनलाईन : कालपासून महाराष्ट्राच्या जनतेने राजकारणातील सत्तानाट्याचा नवा अंक अनुभवला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मुख्य नेते अजित पवार आणि पक्षातील मातब्बर नेत्यांनी पक्षाला रामराम करत सरकारमध्ये सामील झाले. यामध्ये नगरचे आमदार नीलेश लंके यांचाही समावेश आहे. खरं तर गेलेले आमदार यांच्याविषयी जनतेतून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना नीलेश लंके यांच्या ट्वीटने लक्ष वेधलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात,

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,मा.अजितदादा पवार व मा.सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते व कुटुंब प्रमुख आहेत. ह्या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सद्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे. तरी येणाऱ्या दोन दिवसात सर्वाना अपेक्षित असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो!

– आपलाच निलेश ज्ञानदेव लंके आमदार पारनेर-नगर विधानसभा मतदार संघ”

विशेष म्हणजे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही कालच्या पत्रकार परिषदेत येत्या 2-3 दिवसांत चित्र स्पष्ट होईल असं सुतोवाच केलं होतं. त्यातच नीलेश लंके यांनीही आपल्या ट्वीटमध्ये दोन दिवसांत अपेक्षित निर्णय होईल असं म्हटल्याने चर्चेला उधाण आले आहे

Back to top button