बीड : पुरूषोत्‍तमपुरीत गोदावरी नदी पात्रात भाविक बुडाला

गोदावरी नदी पात्रात भाविक बुडाला
गोदावरी नदी पात्रात भाविक बुडाला

बीड : पुढारी वृत्‍तसेवा माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे सध्या अधिक मासानिमित्‍त पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी देशभरातून भावीक भक्त येत आहेत. पुरुषोत्तम पुरी येथे गोदावरी नदी वाहते. या नदीमध्ये आंघोळ करून भाविक भक्त दर्शन घेतात. आंघोळ करत असताना जालना जिल्ह्यातील एक भक्त गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाला असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली. यावेळी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व माजलगाव तहसीलदार वर्षा मनाळे दाखल झाले आहेत. बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

या विषयी माहिती अशी की, मारुती खवले (वय ४५ वर्षं) राहणार पाटोदा तालुका परतूर जिल्हा जालना हे आज (शुक्रवार) आपल्या नातेवाईकांसोबत पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी आले होते. ते गोदावरी नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा पाय घसरून ते पाण्यात बुडाले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी सांगितली आहे.

ही घटना आज सकाळी नऊच्या दरम्यान घडली. बुडालेल्या व्यक्तीचा स्थानिक लोक शोध घेत असून, यावेळी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी व तहसीलदार वर्षा मनाळे घटनास्थळी दाखल झाले आहेत. बुडालेल्‍या व्यक्‍तीचा शोध कार्य चालू असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news