‘पराभव आधी रणात नाही तर’ …; अमोल कोल्हेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल | पुढारी

'पराभव आधी रणात नाही तर' ...; अमोल कोल्हेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील शेतकरी, महिला आणि मध्यमवर्गीयांची ‘जन की बात’ ऐकण्यापेक्षा ‘मन की बात’ करण्यात स्वारस्य आहे. सत्ताधारी सरकरारकडून भितीपोटी विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच पराभव आधी रणात नाही तर तो मनात होतो, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदी आणि सत्ताधारी सरकारवर ( Amol Kolhe) केला आहे.

 Amol Kolhe: सरकारला आरसा पहायचाच नाही तर केवळ स्तुती ऐकायची

कोल्हे केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष आघाडीच्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना अमित शहा २ तासांहून अधिक वेळ बोलले. अर्थमंत्री सीतारामन १.३० तास बोलल्या तर सत्ताधारी पक्षातील इतर अनेक नेत्यांनाही बोलण्यासाठी ‘तासंतास’ वेळ मिळाला. पण यांच्या तुलनेत विरोधी पक्षांच्या नेत्यांना मिळालेला वेळ मात्र नगण्य होता.हे सगळ्या देशाने पाहिले. यावरून असे दिसते की, सत्ताधारी मोदी सरकारला आरसा पहायचाच नाही तर केवळ स्व:ताची स्तुती ऐकायची आहे. म्हणून हातच्या कंकणाला आरसा कशाला? असा टोलाही अमोल कोल्हे यांनी लगावला.

विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याची सत्ताधारी पक्षाची नीती

सरकार उघड उघड विरोधकांचा आवाज दाबत आहेत. कारण सरकारला केवळ स्वत:ची स्तुती ऐकायची आहे. यावरूनच विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याची सत्ताधारी पक्षाची नीती आणि त्यांच्या मनात विरोधी पक्षांबद्दल निर्माण झालेली भीती स्पष्ट होते. हा लोकशाहीचा विजय आहे, असेही अमोल कोल्हे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button