PM Narendra Modi : 'जे शांत तेच मणिपूरवरून राजकारण करतायत'; कपिल सिब्बल यांचा पंतप्रधान मोंदीवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : PM Narendra Modi : मणिपूर हिंसाचारावार ‘जे’ शांत आहेत तेच राजकारण करत आहेत, अशी टीका ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली आहे. विरोधक मणिपूर हिंसाचारावरून राजकारण करत असल्याची टीका अविश्वास ठरावावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षाच्या आघाडीवर केली होती. यानंतर सिब्बल यांनी पीएम मोदी यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. यासंदर्भातील ट्विट राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून केले आहे.
PM :
Opposition “playing politics” over ManipurNot quite
Remember, the Supreme Court suo motu expressed deep concern over violence against women. Said was “unacceptable in a constitutional democracy”.
Not the opposition, but those who were silent were “playing politics”.
— Kapil Sibal (@KapilSibal) August 11, 2023
सिब्बल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”विरोधक मणिपूर हिंसाचारावरून राजकारण करत आहेत”, ही मोदींनी केलेली टीका चुकीची आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून मणिपूरमधील महिलांवरील हिंसाचारावर तीव्र चिंता व्यक्त केली होती. अशी घटना संवैधानिक लोकशाहीत अस्वीकार्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले असल्याची आठवण कपिल सिब्बल यांनी केलेल्या ट्विमधून करून दिली आहे.