Parveen Babi Birth Anniversary : बिनधास्त, सिगारेट ओढणाऱ्या परवीन बाबीचा रहस्यमयी झाला होता मृत्यू

parveen babi
parveen babi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

परवीन बाबी (४ एप्रिल १९४९ – २० जानेवारी २००५) ही हिंदी चित्रपटसृष्‍टीतील एक सदाबहार अभिनेत्री होती. (Parveen Babi) आपल्या ग्लॅमरस आणि बोल्‍ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या परवीन बाबीने हिंदी सिनेइंडस्‍ट्रीला एकापेक्षा एक चित्रपट दिले. आज तिचा जन्मदिवस. (Parveen Babi) अमर अकबर ॲन्थोनी, दीवार, नमक हलाल, शान यांसारखे सुपरहिट चित्रपट तिच्‍याच नावे आहेत. यामध्ये तिने साकारलेल्‍या भूमिका आजही वाखाणण्‍याजोगे आहेत. परवीन आणि अमिताभ बच्चनसोबतची तिची जोडी लोकप्रिय होती. कधी लिव्‍ह ईन रिलेशनशीप तर कधी विवाहित व्‍यक्‍तीसोबत रिलेशनशीपला घेऊन ती चर्चेत होती. अफेअर्सनंतरदेखील ती शेवटी एकटीच राहिली. दुर्देवाने अखेरच्‍या क्षणी तिच्‍याजवळ कोणीही नव्‍हते. बॉलिवूड इंडस्‍ट्रीमध्‍ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देणार्‍या 'या' अभिनेत्रीबद्‍दल जाणून घेऊया.

अभिनयातील करिअरमध्‍ये यशाच्‍या शिखरावर असताना तिने १९८३ साली अचानक सिनेजगत सोडण्याचा निर्णय घेतला. एका रिपोर्टने दिलेल्‍या माहितीनुसार, यादरम्यान तिची मानसिक स्थिती काहीशी बिघडल्याची चर्चा सुरू होती.

७० च्‍या दशकातील एक प्रसिध्‍द अभिनेत्री परवीन बाबीने आपल्‍या करिअरमध्‍ये अनेक हिट चित्रपट दिले. तिने चित्रपटांमध्‍ये ग्लॅमरस कपडे घालण्‍याची प्रथा सुरू केली, असे म्‍हटले तरी वावगे ठरणार नाही. त्‍याआधी अभिनेत्री स्लीवलेस ब्लाउजसोबत साडी आणि घट्‍ट सूट घातलेले दिसत असत. परवीनची प्रतिमा सिनेइंडस्ट्रीत बोल्ड ॲक्ट्रेस अशी होती. १९७६ ते ८० च्‍या दशकात ती इंडस्ट्रीमध्‍ये सर्वात महागड्‍या अभिनेत्रींमध्‍ये दुसर्‍या क्रमांकावर होती.

अशी मिळाली चित्रपटात संधी

४ एप्रिल, १९४९ रोजी सौराष्ट्रच्‍या जूनागढ येथे जन्मलेल्‍या परवीन बाबीने अहमदाबादमधील सेंट झेवियर्स कॉलेजमधून इंग्रजीतून साहित्य बीए केले होते. त्‍या १० वर्षांच्‍या होत्‍या, त्‍यावेळी परवीन यांच्‍या वडिलांचे निधन झाले. ती मॉडलिंगमध्‍ये करिअर करण्‍याच्‍या शोधात होती. असे म्‍हटले जाते की, बीआर इशारा यांना आपल्‍या चित्रपटासाठी नवा चेहरा हवा होता. एक दिवस त्‍यांची नजर परवीन बाबीवर पडली. त्‍यावेळी परवीन सिगारेट ओढताना दिसली होती. मिनी स्कर्ट घालून हातात सिगरेट घेतलेल्‍या बॉबीचा अंदाज बी. आर. इशारा यांना आवडला होता. त्‍यानंतर इशारा यांनी आपल्‍या चित्रपटासाठी परवीनचीच निवड केली.

पाश्चात्य राहणीमान असणार्‍या परवीन बाबीला चित्रपट दिग्‍दर्शक बीआर इशारा यांनी पहिल्‍यांदा क्रिकेटर सलीम दुर्रानीसोबत चित्रपट 'चरित्र'मध्‍ये (१९७३) संधी दिली. हा चित्रपट फ्‍लॉप झाला. परंतु, परवीन बाबीची जादू कायम राहीली. तिचे अनेक चित्रपट फ्‍लॉप ठरले. पण, नंतरच्‍या काळात मात्र, अनेक चित्रपट हिट ठरले. १९७४ मध्‍ये 'मजबूर' चित्रपटामुळे ती प्रसिध्‍दीझोतात आली. 'मजबूर'मध्‍ये तिने महानायक अमिताभ बच्‍चन यांच्‍यासाबेत काम केले होते. जवळपास पन्‍नास चित्रपटांमध्‍ये तिने काम केले.

आयुष्‍यात पसरला अंधार

सिल्वर स्क्रीनवर तिचे आयुष्‍य जितके चमकदार दिसत होते, तितका तिच्‍या आयुष्‍यात अंधारात पसरला होता. १९९० च्या दशकात ती एकटी पडत गेली. अखेर २००५ साली स्वत:च्या घरी तिचा मृत्यू झाला.

लव्हलाईफमुळे चर्चेत

परवीन आपल्‍या लव लाईफमुळे नेहमी चर्चेत राहिली. असे म्‍हटले जाते की, तिचे अफेअर महेश भट्ट यांच्‍याशिवाय, डॅनी आणि कबीर बेदीशीही होते. कबीर आणि डॅनी आणि परवीनने एकत्र १९७६ मध्‍ये 'बुलेट'मध्‍ये काम केले होते. ऋषिकेश मुखर्जी यांचा चित्रपट 'रंग बिरंगी' आणि इस्माइल श्रॉफ यांच्‍या 'दिल आखिर दिल है' यासारख्‍या चित्रपटामध्‍ये तिने काम करणे सुरू केले होते. परंतु, या सर्वांवर

अचानक ब्रेक लागला होता.

एका प्रसिध्‍द मासिकाला दिलेल्‍या मुलाखतीत महेश भट्ट यांनी आपल्‍या आणि परवीनच्‍या नात्‍याविषयी अनेक राज सांगितले होते. त्‍याआधी तिचे अफेअर कबीर बेदीसोबत होते. परंतु, त्‍यांचे रिलेशनशीप फार काळ टिकले नाही. दोघांचा ब्रेकअप झाला. त्‍यानंतर महेश आणि परवीन एकत्र आले. परवीनसोबत महेश भट्ट यांनी आपल्‍या रिलेशनशीपवर 'अर्थ' हा चित्रपट बनवला.

असे सांगितले जाते की, १९७९ मध्‍ये महेश भट्ट यांना अशी एक गोष्‍ट समोर आली की, ज्‍यामुळे त्‍यांना धक्‍काच बसला. एक दिवस महेश ज्‍यावेळी घरी परतले त्‍यावेळी त्‍यांनी पाहिले की, परवीन चित्रपटातील कपडे घालून घराच्‍या एका कोपर्‍यात बसली होती. महेश यांना पाहताच परवीनने त्‍यांना गप्‍प राहण्‍याचा इशारा केला. त्‍यानंतर परवीन म्‍हणाली, 'बोलू नको, खोलीमध्‍ये कुणीतरी आहे. तो मला मारण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.' परवीनची स्‍थिती पाहून महेश यांना धक्‍का बसला. याआधी त्‍यांनी परवीनचे हे रुप कधीच पाहिले नव्‍हते.

या घटनेनंतर परवीनची स्‍थिती आणखी बिघडत गेली. डॉक्टरांनी सांगितले की तिला सिजोफ्रेनिया नामक मानसिक आजार आहे. त्‍यावेळी परवीन अनेक चित्रपट करत होती. दिग्‍दर्शकांना चित्रपट ठप्‍प होण्‍याची भीती होती. महेश भट्ट यांनी चांगल्‍या डॉक्‍टरांकडून तिच्‍यावर उपचार सुरू केले. परंतु, त्‍या उपचाराचा काहीही उपयोग होऊ शकला नाही.

तिने आपला को-स्टार अमिताभ बच्चन यांच्‍यावरही आरोप केले. परवीनला वाटत होते की, अमिताभनी आपल्‍या मागे गुंड पाठवले आहेत. अशी स्‍थिती पाहून परवीन यांना एका खोलीत बंद करण्‍यात आले. तिला मीडिया आणि पब्लिकच्‍या नजरेपासून दूर ठेवण्‍यात आले. मध्‍यंतरीच्‍या काळात महेश भट्‍टही तिच्‍यापासून दूर गेले. तिच्‍याजवळ कोणीही नव्‍हते. ती एकटी पडत गेली.

ब्लॉकबस्टर चित्रपट

परवीन बॉबीने 'नमक हलाल', 'दीवार', 'अमर अकबर अँथोनी' आणि 'शान' 'खुद्दार', 'काला पत्थर', 'सुहाग' यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट केले. तिचा शेवटचा चित्रपट १९८८ मध्‍ये आलेला 'आकर्षण' होता. १९७६ ते १९८० च्‍या दरम्‍यान, अभिनेत्री रीना रॉयनंतर परवीन बॉबी सर्वात अधिक चित्रपटाचे मानधन घेणारी अभिनेत्री होती.

जगाचा निरोप

२२ जानेवारी २००५ ला परवीनने नेहमीप्रमाणेच दूध आणि वृत्तपत्र घेण्‍यासाठी घराचा दरवाजा उघडला नाही. त्‍यावेळी पोलिसांनी याची माहिती देण्‍यात आली. यानंतर परवीनचा मृतदेह पोलिसांनी ताब्‍यात घेतला. एक काळ आपल्या अभिनयाने रूपेरी पडदा व्यापणार्‍या परवीन बाबीने जगाचा निरोप घेतला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news