कोल्हापूर : भटक्या कुत्र्यांची दहशत! | पुढारी

कोल्हापूर : भटक्या कुत्र्यांची दहशत!

कोल्हापूर : एकनाथ नाईक

जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता, येथील नागरिकांनी कुत्र्यांपासून सावधानता बाळगली पाहिजे. जिल्ह्यात अनेकजण श्वान प्रेमी आहेत. हे जरी खरे असले तरी कुत्र्याच्या लाळेच्या संपर्कात आल्यामुळे नागरिकांना रेबीज होतो हे सर्वांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. शहराच्या गल्लीबोळासह उपनगरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.

कोल्हापूर शहरात जवळपास 3500 ते 4000 पाळीव तर शहरात 30 हजारांहून अधिक भटकी कुत्री आहेत. कुत्रा पाळीव असो किंवा भटका त्यांच्या लाळेच्या संपर्कात आल्यास रेबीज होतो. त्यामुळे दक्ष राहून रेबीज होण्याअगोदर कुत्र्याला व स्वतःला लस टोचून घेणे महत्त्वाचे आहे. कुत्रा स्वतःहून चावला असेल तर ते अधिक धोकादायक असते.

त्यामुळे नागरिकांनी अधिक सकर्त राहून वेळेवर उपचार घ्यावेत. दुर्लक्ष करू नये. शहरात विक्रमनगर, शिवाजी पार्क, मध्यवर्ती बसस्थानक, सदरबाजार, कदमवाडी, राजारामपुरी, यादवनगर, कनाननगर, लक्ष्मीपुरी, कसबा बावडा, जवाहरनगर, आरकेनगर, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, बिंदू चौक, मटण मार्केट, सीपीआर चौक, दसरा चौक, शिवाजी चौक, मंगळवार पेठे, शिवाजी पेठे, उत्तरेश्वर, गंगावेश चौक परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठावावर आहे. तर ग्रामीण भागात पाचगाव, उचगाव, गोकुळ शिरगाव, इचलकरंजी, हातकणंगले, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कळे, सांगरूळ, कोडोली, पेठवडगाव, कागल, मुरगूड, आजरा, बालिंगा, हुपरी, साळवण, गगनबावडा, पन्हाळा, कोतोलीसह हॉटेल, चिकन सेंटरच्या गाड्या भोवती भटक्या कुत्र्यांचा कळप असतो.

रेबीजची लक्षणे

रेबीजची लक्षणे इतर आजारांपेक्षा थोडी वेगळीच आहेत. पण रुग्णास ती सहज लक्षात येऊ शकतात. पाणी पिण्यास भीती वाटणे (हायड्रोफोबिया), वार्‍याची भीती वाटणे, शरीराचे स्नायू ढिले पडणे आदी लक्षणे ही रेबीजची आहेत.

कुत्रा चावल्यास काय करावे?

  • जखम स्वच्छ पाण्याने धुवावी
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.
  • कुत्र्यावर 10 दिवस लक्ष ठेवा.
  • रेबीज आजारी कुत्र्याचा मृत्यू होतो.
  • पाळीव कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस द्यावी.

काय टाळावे?

  • लहान मुलांना कुत्र्यापासून दूर ठेवा.
  • कुत्र्याच्या लाळेशी संपर्क टाळा.
  • भटक्या कुत्र्यापासून पाळीव कुत्री नियंत्रणात ठेवावीत.
  • हळद लावणे, तेल पिणे, झाडपाला औषधे घेणे टाळा.
  • कुत्रा चावल्यानंतर किती दिवसांत रेबीज होतो?
  • कुत्र्याने चावा घेतल्यास 10 ते 10 वर्षांत कधीही रेबीज होऊ शकतो. त्यामुळे कुत्र्याने चावा घेतल्याबरोबर सरकारी किंवा खासगी
  • रुग्णालयात जाऊन लसीकरण करून घ्यावे. त्यामुळे रेबीज संसर्ग होणर नाही. सर्व शासकीय रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस मोफत दिली जाते.

Back to top button