ICC मध्ये वाढली बीसीसीआयची ताकद, जय शहा यांना मिळाली मोठी जबाबदारी

ICC मध्ये वाढली बीसीसीआयची ताकद, जय शहा यांना मिळाली मोठी जबाबदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. जय शहा यांची ICC च्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. ही समिती ICC इव्हेंटसाठी बजेट वाटप ठरवते आणि एकूण मिळालेल्या महसुलातून सदस्य देशांना पैशाचे वितरण करते.

या आठवड्याच्या अखेरीस मेलबर्न येथे होणाऱ्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीच्या एक आठवडा अगोदर जय शहा आणि आयपीएलचे अध्यक्ष अरुण धूमल यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला होता. ICC बोर्डावर BCCI चे प्रतिनिधी (BCCI president from 2019 to October) म्हणून शहा यांनी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची जागा घेतली.

अरुण धूमल हे मुख्य कार्यकारी समितीचे सदस्य असतील. ESPNcricinfo च्या मते शहा हे F&CA चे सदस्यदेखील असतील आणि ते क्रिकेट आयर्लंडचे माजी अध्यक्ष रॉस मॅक्युलम यांची जागा घेतील, जे लवकरच निवृत्त होणार आहेत. दरम्यान, शनिवारी ICC बोर्डाने ग्रेग बार्कले यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी दोन वर्षांच्या कालावधीसाठी एकमताने पुन्हा निवड केली. तवेंगवा मुकुहलानी यांनी माघार घेतल्यानंतर बार्कले यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना पुढील दोन वर्षे अध्यक्षपदावर राहण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला.

जय शहा बीसीसीआयचे सचिव म्हणून काम करत आहेत. तर आशिष शेलार यांची बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव शुक्ला यांची उपाध्यक्षपदी, तर देवजित सैकिया यांची संयुक्त सचिवपदी निवड करण्यात आली. अरुण धुमल यांची आयपीएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नुकतीच BCCI चे ३६ वे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news