भारतीय सैनिक धावले होते ज्‍यू बांधवांच्‍या मदतीला! जाणून घ्‍या ‘हैफा’मुक्‍तीचा इतिहास

पहिल्‍या महायुद्धावेळी भारतीय सैनिकांनी ज्‍यू बांधवांची वस्‍ती असलेले हैफा शहर मुक्त ( Battle of Haifa )  केले होते.
पहिल्‍या महायुद्धावेळी भारतीय सैनिकांनी ज्‍यू बांधवांची वस्‍ती असलेले हैफा शहर मुक्त ( Battle of Haifa ) केले होते.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दहशतवादी संघटना हमासने शनिवारी (दि.७) इस्त्रायलवर हल्‍ला केल्‍याने जगभरात खळबळ उडाली आहे. इस्रायल-हमास युद्धाचा भडका उडाला असून, याचे दीर्घकाळ परिणाम होण्याची शक्यता व्‍यक्‍त केली जात आहे. जगातील एकमेव ज्यू राष्ट्र अभूतपूर्व दहशतवादी हल्ल्याशी लढत ठाम आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रायलला पाठिंबा असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. तुम्‍हाला माहित आहे का, पहिल्‍या महायुद्धावेळी भारतीय सैनिकांनी ज्‍यू बांधवांची वस्‍ती असलेले हैफा शहर मुक्त ( Battle of Haifa )  केले होते. जाणून घेवूया हैफा शहर मुक्‍तीचा इतिहास…

Battle of Haifa : पहिल्‍या महायुद्धावेळी नेमकं काय घडलं होतं?

पहिल्‍या महायुद्धात भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्‍यावेळी जनरल एडमंड अॅलेन्बी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील जोधपूर, म्हैसूर आणि हैदराबाद संस्थानांमधून घोडदळ सैनिक ज्‍यू बांधवांची वस्‍ती असलेले हैफा शहरात पाठवले होते. १९१८ मध्‍ये भारतीय सैनिकांनी हैफा शहराला तुर्कस्तानच्या ओटोमन साम्राज्यापासून मुक्त केले. हे शहर ४०२ वर्षांपासून तुर्कीच्या ताब्यात होता. या युद्धात भारतीय जवानांनी बहाई समाजाचे आध्यात्मिक नेते अब्दुल-बहा यांनाही वाचवले होते.

भारतीय सैनिकांनी तलवारी-भाल्‍यांनी केला बंदुका आणि मशीनगचा मुकाबला

जोधपूरच्या सैनिकांनी माउंट कार्मेलच्या टेकडीवरून वेढा घालून जर्मन आणि तुर्की सैन्याला जबर धक्‍का दिला होता. दुसरीकडे, म्हैसूरच्या सैनिकांनी टेकडीच्या दक्षिणेकडून हल्ला केला. भारतीय सैनिक तलवारी आणि भाले घेऊन लढत होते; पण तुर्कीच्या सैन्याकडे बंदुका आणि मशीनगन होत्या. लढाईत सुरुवातीला अनेक भारतीय जवान शहीद झाले. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी सैनिकांना परत येण्यास सांगितले; परंतु भारतीय सैनिकांनी पाठ फिरवणे योग्य मानले नाही. त्‍यांनी अखेरपर्यंत लढा दिला आणि विजय नोंदवला. याच शहरात शहीद झालेल्‍या भारतीय जवानांच्‍या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा अस्थिकलश भारतात पाठवण्यात आले होते.

इस्रायलच्या इतिहासात भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या कहाण्या

इस्रायलच्या इतिहासातही भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या कहाण्यांची नोंद करण्‍यात आली आहे. मिलिटरी ऑपरेशन इजिप्त आणि पॅलेस्टाईन: खंड 2 या पुस्तकात लिहिले आहे, "हैफा शहरातील संपूर्ण मोहिमेदरम्यान घोडेस्वारांचे शौर्य पाहायला मिळाले.वेगाने धावणाऱ्या घोड्यांना रोखण्यात मशीनगनच्या गोळ्याही अयशस्वी ठरल्या. मात्र गंभीर जखमी झालेले अनेक सैनिकांनी आपले प्राण गमावले.
हैफामधील विजयानंतर 30 वर्षांनी इस्रायलच्या निर्मितीचा मार्ग खुला

या युद्धात भारतीय ब्रिगेडने १३५० जर्मन सैनिकांना पकडले होते. तसेच १७ बंदुका आणि ११ मशीनगन जप्त केल्‍या होत्‍या. ४४ भारतीय जवान शहीद झाले, ज्यांची हैफा शहरात समाधी येथे बांधण्यात आल्‍या आहेत. या लढाईत भारतीय सैनिकांचे ६३ घोडेही मारले होते तर ८० जण जखमी झाले. हैफामध्‍ये ब्रिटिश सैन्याच्या विजयानंतर 30 वर्षांनी इस्रायलच्या निर्मितीचा मार्ग खुला केला झाला.

Battle of Haifa : मेजर दलपती सिंग ठरले नायक

कॅप्टन अमन सिंग बहादूर आणि फादर जोर सिंग यांना हैफा युद्धातील शौर्याबद्दल इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट (IOM) देण्यात आले. कॅप्टन अनुप सिंग आणि द्वितीय लेफ्टनंट सगत सिंग यांना मिलिटरी क्रॉस (MC) पुरस्‍काराने गौरव करण्‍यात आला होता. हैफा शहर मुक्त करण्यासाठी मेजर दलपत सिंग यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना इतिहासात 'हिरो ऑफ हैफा' म्हणून ओळखले जाते. त्यांना मिलिटरी क्रॉसही देण्यात आला होता.

भारतीय सैनिकांचे शौर्याचा पाठ्यपुस्तकात समावेश

पहिल्या महायुद्धात हैफा येथे लढताना शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या हौतात्म्याबद्दल इस्रायलच्या शाळांमध्येही शिकवले जाते. सुमारे पाच वर्षांपूर्वी हैफा नगरपालिकेने या लढाईचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय लष्कराच्या शौर्याचे स्मरण म्हणून हैफा नगरपालिका दरवर्षी येथे कार्यक्रमाचे आयोजन करते.

दोन्ही देशांमध्ये हैफा दिन साजरा केला जातो

दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी भारतीय लष्कर हैफा दिन साजरा करते. इस्रायलमध्येही याच दिवशी हैफा डे साजरा केला जातो. या काळात आठवडाभर तेथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

हैफा इस्रायलमधील तिसरे मोठे शहर

इस्रायलमधील जेरुसलेम आणि तेल अवीव नंतर हैफा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे मोठे शहर आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ६४ चौरस किलोमीटर असून लोकसंख्या सुमारे २.८०लाख आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news