जूने नाशिक: वडाळा रोड येथील रजा गोट फार्म मधील बकरी ईदनिमित्त विक्रीसाठी आलेले राजस्थानमधील बोकडे. (छाया: कादिर पठाण)
जूने नाशिक: वडाळा रोड येथील रजा गोट फार्म मधील बकरी ईदनिमित्त विक्रीसाठी आलेले राजस्थानमधील बोकडे. (छाया: कादिर पठाण)

Bakri Eid : ईदनिमित्त सजले बकरा बाजार; शहरात शेकडो बकर्‍यांची आवक

Published on

जुने नाशिक: कादिर पठाण

ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद गुरुवार, (दि.29) जून रोजी साजरी होणार आहे. यानिमित्ताने नाशिक शहरात अनेक प्रकारचे बकरे विक्रीसाठी दाखल झाले असून ठिकठिकाणी अस्थायी बकरा बाजार सजले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरातसह विविध राज्यांमधून नाशिक शहरात कुर्बानीसाठी उपायुक्त अश्या खास बकर्‍यांची आवक झाली आहे. सोजत, शिरोही, गुजरी, तोतापरी, अजमेरा, बीटल, भरभरा, कोटा, काठीयावाडी अश्या अनेक प्रजातीचे बोकड साधारणतः पंधरा ते चाळीस हजार रुपांपर्यंत विकले जात आहे.

ईद-उल-अजहाच्या दिवशी बकर्‍यांची कुर्बानाची परंपरा आहे, या अनुषंगाने दरवर्षी ईदच्या काळात बकरा बाजारात देशभरात कोट्यवधींची उलाढाल पाहायला मिळते. नाशिक शहरातही देशभराच्या विविध राज्यांमधून बकर्‍यांची आवक होत असते. फाळके रोडवरील घास बाजारात येथील मौला बाबा तालीम जवळ रोज संध्याकाळी विशेष अस्थायी बकरा बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. जुने नाशिकसह वडाळा रोड, अशोक रोड, जयदीप नगर, वडाळा गाव, मोहम्मद अली रोड, पखल रॉड येथे बकर्‍याचे अस्थायी बाजार सजले आहे. या ठिकाणी ग्राहकाची संख्या वाढू लागली आहे.

मुदस्सर शेख, संचालक रजा गोट फार्म
मुदस्सर शेख, संचालक रजा गोट फार्म

सामान्य दिवसांच्या तुलनेत बकरी ईदच्या वेळेस बोकड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ होते. यावर्षी राजसथानमधील आलेल्या बोकड्यांना जास्त पसंती मिळत आहे. जशी ईद जवळ येत जाईल तशी बाजारांमध्ये ग्राहकांची संख्या वाढत जाईल. मागील काही वर्षांपासून बोकडे वजन प्रमाणे जायचे पण यावर्षी मात्र नगावर विक्री सुरू झाली आहे. आमच्या येथे सोजत, शिरोही, गुजरी अश्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. – मुदस्सर शेख, संचालक रजा गोट फार्म.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news