Badminton Asian Games 2023: भारताने रचला इतिहास; ४१ वर्षानंतर पुरुष एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक

Asian Games 2023
Asian Games 2023

पुढारी ऑनलाईन डेस्क: पुरुष एकेरी बॅडमिंटनमध्ये भारताने नवीन इतिहास रचला आहे. आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताने कांस्यपदक मिळवत पुरुष एकेरी बॅडमिंटनमधील दुष्काळ संपवला. तब्बल ४१ वर्षानंतर पुरुष एकेरी बॅडमिंटनमध्ये भारताने कांस्यपदक पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत हे बॅडमिंटनमधील दुसरे पदक आहे यापूर्वी पुरुषांच्या सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने रौप्यपदक जिंकले आहे. (Badminton Asian Games 2023)

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरी बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या ली शिफेंगने भारताच्या प्रणॉय कुमारचा २-० पराभव केला. चीनने पुरुष एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताला  कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. परंतु, १९८२ नंतर तब्बल ४१ वर्षानंतर भारताला पुन्हा पुरुष एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक मिळाल्याने पुरुष एकेरी बॅडमिंटनमधील दुष्काळ संपला आहे. उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच भारताचे कांस्यपदक निश्चित झाले होते. (Badminton Asian Games 2023)

चीनच्या ली शिफेंगने पहिला गेम २१-१६ गुणांनी जिंकला

आशियाईतील एकेरी पुरुष बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीतील पहिल्या गेममध्ये सुरूवातीला अतिशय चुरशीचा सामना करत दोघांनीही ५-५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर भारताच्या प्रणॉय कुमारने आणखी दोन गुण मिळवत गेमममध्ये आघाडी कायम ठेवली. चीनच्या ली शिफेंगने भारताला कडवी झुंज देत आघाडी ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रणॉयने दमदार खेळी करत पुन्हा १० गुण मिळवत आघाडी घेतली. चीनच्या प्रतिस्पर्धीने गुणांचा पाठलाग करत, १०-१० अशी बरोबरी साधली. पहिल्या अटीतटीच्या गेममध्ये पुन्हा दोघांनी १४-१४ अशा गुणांची बरोबरी साधली. त्यानंतर चीनच्या ली शिफेंगने १९-१६ अशी आघाडी काय ठेवली. पहिला गेम चीनच्या ली शिफेंगने २१-१६ गुणांनी आपल्या नावावर केला. (Badminton Asian Games 2023)

गेम २: प्रणॉय कुमारची पकड सुटली; सामना चीनच्या खिशात

दुसऱ्या गेममध्ये १ गुणांसह चीनच्या ली शिफेंगने ०-१ असे गुण मिळवत खाते खोलले. त्यानंतर दोघांनीही ४-४ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या गेममध्ये भारताच्या प्रणॉय कुमार पकड सुटली त्यामुळे चीनच्या ली शिफेंगने ७-४ अशी आघाडी कायम ठेवली. पुन्हा चीनच्या स्पर्धकाने दुसऱ्या गेममध्ये ९-६ अशी आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या गेममधील शेवटच्या टप्प्यात १२-६ अशी आघाडी चीनने कायम ठेवाली. दुसऱ्या गेममध्येही प्रणॉय कुमारने झुंज देऊनही तो कमबॅक करू शकला नाही. चीनची २०-९ अशी आघाडी कायम राहिली. २१-९ अशी आघाडी कायम राखत चीनने संपूर्ण सामना खिशात टाकत, आशियाई पुरुष एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. (Badminton Asian Games 2023)

Badminton Asian Games 2023: बॅडमिंटन पुरुष एकेरीतील दुष्काळ संपला

यापूर्वी 1982 मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सय्यद मोदी यांनी बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर तब्बल 41 वर्षे भारत या क्रीडा प्रकारात पदक जिंकू शकला नव्हता. पण हँगझोऊ येथील स्पर्धेत प्रणॉयने (HS Prannoy) बॅडमिंटनच्या एकेरीतील पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे. दुखापतीशी झुंज देत प्रणॉयने निर्णायक गेममध्ये दोन मॅचपॉइंट वाचवले आणि सलग चार गुणांसह गेम आणि सामना जिंकला. सामन्यानंतर प्रणॉयने आपली जर्सी काढली तेव्हा त्याच्या पाठीवर चिकटवलेले अनेक टेप दिसत होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news