अमरावती, पुढारी वृत्तसेवा : चांदूर बाजारचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. (Bacchu Kadu Accident News) एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसत असताना भरधाव दुचाकीने त्यांना उडवले. त्यांच्या डोक्याला मार लागला असल्याने अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात हा अपघात बुधवारी (११ जानेवारी) सकाळी घडला. अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.