Babar Azam : वन डे क्रिकेटमध्ये बाबर आझमने केला विश्वविक्रम

Babar Azam : वन डे क्रिकेटमध्ये बाबर आझमने केला विश्वविक्रम

कराची; वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने शुक्रवारी वन डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. बाबरने सर्वात कमी इनिंग्जमध्ये 5000 धावा पूर्ण करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेणारा पाकिस्तान चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजीला मैदानावर आला. या सामन्यात बाबरने या मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. सर व्हिव्हियन रिचर्डस, विराट कोहली या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठ्या नावांनाही वन डे क्रिकेटमध्ये असा विक्रम नोंदवता आला नाही. पाकिस्तानी कर्णधाराने यांच्यासह हाशिम अमला व डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकून जगात लय भारी विक्रमाची नोंद केली. (Babar Azam)

बाबरने 97 इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर (101 इनिंग्ज) असलेला विक्रम मोडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वन डे क्रिकेटमध्ये 100 हून कमी इनिंग्जमध्ये 5000 धावा करणारा बाबर हा पहिलाच फलंदाज ठरला. सर व्हिव्हियन रिचर्डस व विराट कोहली यांना हा टप्पा ओलांडण्यासाठी 114 इनिंग्ज, तर डेव्हिड वॉर्नरला 115 इनिंग्ज खेळाव्या लागल्या होत्या. (Babar Azam)

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news