ayushmann khurrana : अर्शदीपला ट्रोल करणं बंद करा’, आयुष्मान खुराना संतापला

arshdeep singh and ayushmann khurrana
arshdeep singh and ayushmann khurrana

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप २०२२ च्या रविवारच्या भारत-पाकिस्तान सामन्यावेळी पाकिस्तानने विजय मिळवला. दरम्यान, सामन्यावेळी कॅच सोडल्यामुळे अर्शदीप सिंगला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. आता बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना अर्शदीपच्या (ayushmann khurrana) समर्थनार्थ उतरला आहे. आयुष्मान खुरानाने अर्शदीप सिंगला ट्रोल करणे बंद करण्याची विनंती केली जात आहे. आयुष्मान खुरानाने अर्शदीप सिंगला पाठिंबा दिलाय. आयुष्मान खुरानाने इन्स्टाग्रामवर विनंती केलीय की, क्रिकेट सामन्यातील सकारात्मक गोष्टी पाहा. (ayushmann khurrana)

आयुष्मानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तो भारत-पाकिस्तानच्या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे. इन्स्टाग्राम रील्सवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आयुष्मान आणि टीम तिरंग्यासोबत दिसत आहेत. त्याच्यासोबत अभिनेता मनजोत सिंह आणि अभिषेक बॅनर्जीदेखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

'जेव्हा पराभूत व्हावं लागतं, तेव्हा मन दुखावतं, पण …'

आयुष्मानने व्हिडिओ शेअर करताना लिहिले, "जवळपास २४ तास झाले, परंतु, काल रात्रीच्या गोष्टी संपून शकत नाही. जेव्हा भारत कुठलाही सामना हारतो, तेव्हा नेहमी मन तुटतं. पण, आपण, सामन्यातील सकारात्मक गोष्टी पाहुया. आता कोहली आपल्या फॉर्ममध्ये परत आला आहे. सूर्यकुमार यादवदेखील एकदम फॉर्ममध्ये आहे."

'कृपया अर्शदीपला ट्रोल करणं बंद करा…'

आयुष्मानने लिहिलंय, "आज आकाश खरंच चांगलं दिसत आहे. आपल्याला आपल्या टीमचे समर्थन करायला हवं. ते सामना हारले परंतु, कृपया परमेश्वरासाठी अर्शदीपला ट्रोल करणं बंद करा. क्रिकेटमध्ये अशी होण्याची होण्याची शक्यता मोठी असते. बाकी अन्य आगामी टुर्नामेंटमध्ये आतिषबाजी पाहायला मिळेल. पुढील सामन्यासाठी प्रार्थना करुया."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news