खुराणा ब्रदर्सची करिअरची गाडी अशी धावली, ऑडिशन व्हिडिओ समोर

अपारशक्ती -आयुष्मान खुराणा
अपारशक्ती -आयुष्मान खुराणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयुष्मान खुराना आणि अपारशक्ती खुरानाच्या करिअरची गाडी कशी धावली? खुराना ब्रदर्सच्या ऑडिशन्सचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याने अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर आपल्या प्रवासाची कशी झाली, याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्याचा भाऊ आयुष्मान खुराना आणि अपारशक्ती दिसतोय हा व्हिडिओ नक्की काय आहे? या मागचं कारण काय, हे यातून दिसतं आहे. अपारशक्ती खुराणा याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून खास कॅप्शन देखील दिली आहे.

संबंधित बातम्या –

त्याने म्हटलंय-"तेथूनच हे सर्व सुरू झाले ♥️आतापर्यंतचा प्रवास पाहता खूप धन्य वाटतं. आमच्या चेहऱ्यांकडे बघून काय बोलावे तेच कळत नाही ? अपारशक्ती खुराणा आणि त्याचा भावाच्या गायनाच्या ऑडिशनने त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व दाखवलं आहे. या पोस्टमुळे चाहत्यांना त्यांच्या बॉलीवूडच्या प्रवासाची झलक दिसते.

व्यावसायिक आघाडीवर अपारशक्तीचे स्त्री 2; अॅप्लॉज एंटरटेनमेंट द्वारे फाइंडिंग राम हा बायोपिक आणि कबीर बेदी इश्वाक सिंग आणि राहुल बोस यांचा समावेश असलेला अतुल सबरवाल दिग्दर्शित आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध बर्लिन देखील येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news